ITR Income Tax Return Information in Marathi – मित्रांनो आज आपण इनकम टॅक्स बद्दलची सविस्तर माहिती म्हणजेच इनकम टॅक्स म्हणजे काय, इनकम टॅक्स रिटर्न म्हणजे काय, ITR चा फुलफॉर्म काय आहे, ITR का दाखल करावा, इनकम टॅक्स रिटर्न भरणे कोणाला बंधनकारक आहे, ITR फाईल करण्याची प्रक्रिया, उत्पन्नाचे प्रकार,आयतीआर फॉर्मचे प्रकार, ITR ऑनलाईन कसे फाईल करावे, ITR File करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, इनकम टॅक्स स्लॅब म्हणजे काय, ITR फाईल करण्याची शेवटची तारीख, ITR फॉर्म कसा डाउनलोड करावा, ITR भरण्याचे माध्यम कोणते आहेत, आयकर सुट किंवा इनकम टॅक्स सूट म्हणजे काय, काय तर कधी लागू होते किंवा केव्हा करावा लागतो, ITR चा मराठी अर्थ, ITR स्थिती ऑनलाईन कशी तपासायची, इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याचे फायदे ही सर्व माहिती तुम्हाला सोप्या पद्धतीने या लेखामार्फत मिळणार आहे. (ITR Income Tax Return Filing login, income tax return filing information in marathi, status, due date, new update, last date, required documents, how to file tax returns, income tax portal, refund status, Form pdf Download, income tax return acknowledgment download and all information in marathi)
इनकम टॅक्स म्हणजे काय? (What is Income Tax In Marathi)
इनकम टॅक्सचा अर्थ मराठीत आयकर असा आहे. हा असा टॅक्स आहे, ज्याला भारत सरकार, लोकांचे वर्षाचे उत्पन्न (Annual Income) वर वसुली करतात. पण भारतात कमी उत्पन्नवाल्यांपासून इनकम टॅक्स घेतला जात नाही. फक्त एक ठराविक प्रमाणात चे जास्त पगार व जास्त उत्पन्नवाल्यांनाही इनकम टॅक्स भरावा लागतो. वेगवेगळ्या प्रकारच्या कमाईवर, हे वेगवेगळ्या नावावर वसूल केले जाते. जसं की, एडवांस टॅक्स, टीडीएस, टीसीएस, वेल्थ टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स इत्यादी.
आयटीआर ITR चा मराठी अर्थ (ITR Meaning In Marathi)
ITR ला मराठीत आयकर म्हटले जाते. आणि आयकर म्हणजे व्यक्तीच्या आर्थिक वर्षाचे उत्पन्न मधून कर म्हणून आयकर केंद्र सरकार मार्फत जमा केला जातो आणि या कराचे दर आयकर अधिनियमला अनुसरून ठरवले जात असतात.
इनकम टॅक्स रिटर्न ITR म्हणजे काय? (What is Income Tax Return in Marathi)
इनकम टॅक्स रिटर्न म्हणजे ITR एक प्रकारच्या फॉर्म असतो. त्यामध्ये आपली इनकम ची सर्व माहिती जमा केलेले असते. आता 07 प्रकारचे ITR फॉर्म अस्तिवात आहेत. कंपनी किंवा व्यक्तीला ITR फाईल करण्याची एक निश्चित तारीख नेमलेली असते. परंतु काही परिस्थितीमुळे सरकार इनकम टॅक्स भरण्याची तारीख पुढे वाढवू शकता. भारत सरकारच्या इन्कम टॅक्स डिपारमेंट मध्ये जमा केले जाणारे फॉर्मला इन्कम टॅक्स रिटर्न म्हणतात. या फॉर्ममध्ये जमा करणारा व्यक्तीची इन्कम आणि त्याच्यावर लागणारे टॅक्स ची माहिती असते.
ITR चा फुलफॉर्म काय आहे? (What is Full Form Of ITR)
ITR फुलफॉर्म Income Tax Return (इन्कम टॅक्स रिटर्न) असा आहे. आणि याला मराठीत आयकर विवरणपत्र किंवा आयकर रिटर्न असे सुद्धा म्हणतात
ITR इनकम टॅक्स रिटर्न का दाखल करावा? (Why File ITR Income Tax Return?)
ज्या व्यक्तीचे उत्पन्न एका वर्षात अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्या व्यक्तीला कायदेशीरपणे ITR भरणे आवश्यक आहे. इनकम टॅक्स च्या नियमानुसार कर आकारणी व्यक्तीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. अश्या व्यक्तींना इनकम टॅक्स दरवर्षी टॅक्स स्लॅबमार्फत म्हणजे ITR ऑनलाइन भरणे आवश्यक आहे. आणि ज्या व्यक्तीचे उत्पन्न जास्त असेल आणि त्या व्यक्तीने इनकम टॅक्स विवरणपत्र भरले नाही. तर त्या व्यक्तीला आयकर विभागाकडून नोटीस येईल व त्या व्यक्तीने योग्य उत्पन्न दाखवून त्या उत्पन्नाच्या कर दिला नाही तर त्या व्यक्तीला करचा रकमेवर दंड किंवा कायदेशीर कारवाई पण होईल. तसेच Financial Year 2022, 2023 साठी टॅक्स विवरणल भरण्याची तारीख 31 जुलै 2023 आहे. आणि दिलेल्या तारखेनंतर इन्कम टॅक्स जमा केला तर दंड सुद्धा आकारला जाऊ शकतो.
इनकम टॅक्स ITR का घेतला जातो? (Why Income Tax Return Taken)
कोणत्याही देशातील सरकारचा आवकचे एक माध्यम म्हणजेच इनकम टॅक्स आहे. सरकारला देश किंवा राज्यावर आपले शासन चालवण्यासाठी आणि लोकांना सुविधा देण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. हा पैसा मुख्यता टॅक्सच्या माध्यमातून येतो. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे. Nations Are Made When Taxes Are Paid याचा अर्थ असा आहे की, जेव्हा टॅक्सची भरपाई केली जाते. तेव्हा संयुक्त राष्ट्र निर्माण होते. या पद्धतीने तुम्हाला टॅक्स बद्दल महत्त्व कळलं असेल. भारतामध्ये सण 1961 मध्ये पास केलेले इनकम टॅक्स एक्ट माध्यमानुसार सरकार ला इनकम टॅक्स वसुलीच्या अधिकार मिळाला आहे.
इनकम टॅक्स रिटर्न भरणे कोणाला बंधनकारक आहे (Who is liable to file income tax return?)
इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी व्यक्तीचे वय आणि वार्षिक उत्पन्न किती आहे याच्यानुसार अवलंबून आहे. 1) व्यक्तीचे वय 59 वर्षापेक्षा कमी आहे आणि त्याचे वार्षिक उत्पन्न अडीचलाखापेशा अधिक आहे. 2) व्यक्तीचे वय 60 ते 70 वर्षे दरम्यान असेल, आणि वार्षिक उत्पन्न तीनलाखापेक्षा अधिक आहे. 2) व्यक्तीचे वय 80 वर्षापेक्षा अधिक आहे आणि वार्षिक उत्पन्न पाच लाखापेक्षा अधिक आहे. उत्पन्न मोजत असताना इनकम टॅक्स रिटर्न कायदा कलम 10 अंतर्गत नोंदलेल्या कर वसुलीची परवानगी न देता उत्पन्नाची मोजणी केली पाहिजे. त्यानंतर ज्या कंपनीने आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये नफा कमवलेला असेल तर अशा कंपनीला इन्कम टॅक्स रिटर्न भरणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे भारतातील कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या व्यक्ती, संस्था, संघटना, कंपनी इन्कम टॅक्स कायदा 1961 नुसार टॅक्स भरण्यासाठी जबाबदार आहेत.
ITR File करण्याची प्रक्रिया (Procedure to File ITR)
जेव्हापासून तुमच्या इन्कम टॅक्स भरण्याची सुरुवात होते तेव्हा तुमचे उत्पन्न आर्थिक वर्षाचे किती आहे आणि घेतलेले उत्पन्न कोणत्या पद्धतीचे आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे त्यासाठी मला माहिती असणे आवश्यक आहे. कोणकोणते उत्पन्न पासून टॅक्स कापला जातो. उत्पन्नाचे प्रकार पुढील प्रमाणे देण्यात आलेले आहेत.
उत्पन्नाचे प्रकार (Types Of Income)
1) पगारातून मिळालेलं उत्पन्न 2) घराच्या मालमत्तेचे उत्पन्न 3) कोणत्याही व्यवसायाद्वारे मिळवलेले उत्पन्न 3) भांडवली नफ्यातून मिळवलेले उत्पन्न 4) इतर स्रोताकडून मिळालेले उत्पन्न त्यानंतर व्यक्तीचे उत्पन्न कोणत्या प्रकारचे आहे त्या पद्धतीने व्यक्तीला सर्व कागदपत्रे जमा करावे लागतील. त्यासाठी व्यक्तीच्या पगाराची पावती, बँक खाते, आधार कार्ड व पॅन कार्ड आणि यानंतर काही फॉर्म व कागदपत्रे जमा करावे लागतील. त्यानंतर सर्व कागदपत्रे व्यक्तीच्या CA द्यायचे आहेत. यानंतर व्यक्तीची ITR भरण्याची प्रक्रिया चालू होईल.
ITR इनकम टॅक्स फार्म कसा डाउनलोड करावा? (How to Download ITR Income Tax Form?)
Users इनकम टॅक्स रिटर्न्स ITR फॉर्मला डाउनलोड पण करू शकता. इनकम टॅक्स रिटर्न्स फॉर्म डाउनलोड करण्यासाठी खालील माहिती बघून डाऊनलोड करा. सर्वातआधी तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ची ऑफिसियल वेबसाईटवर incometaxindia.gov.in वर जाऊन क्लिक करा. Form/Download वर क्लिक करा. आता Income Tax Returns वर क्लिक करा. इथे आल्यावर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न्स चे सर्व फॉर्म डाउनलोड करू शकता.
ITR File करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे (Documents Required for Filing ITR)
जर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करायची आहे तर त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची माहिती असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे पेन कार्ड, आधार कार्ड, बँक खाते डिटेल्स मध्ये तुम्हाला बँकेचे नाव, खाते नंबर, खात्याचा प्रकार, आणि IFSC कोड द्यायचा आहे. यानंतर तुम्हाला कंपनीकडून देण्यात आलेला फॉर्म 16 ची पण गरज पडेल यामध्ये कामगाराचा पगार आणि टॅक्स कापण्याचे माहिती असते. तुम्हाला फॉर्म 26AS ची गरज पडेल या फॉर्म मार्फत इन्कम वर लागणारे टॅक्स पूर्ण माहिती मिळू शकता. यामध्ये आयकर विभागची वेबसाईट मधून डाऊनलोड करू शकता.
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खाली देण्यात आली आहे. (Required Documents For ITR)
1) पॅन कार्ड 2) बँक स्टेटमेंट 3) बँका किंवा पोस्ट ऑफिस कडून व्याज प्रमाणपत्र 4) कर बचत गुंतवणुकीचा पुरावा 5) फॉर्म 16 (नोकरदार व्यक्तीसाठी) 6) पगार स्लीप 7) TDS प्रमाणपत्र 8) फॉर्म 16 A 9) फॉर्म 26 AS
ITR ऑनलाइन कसे फाईल करावे (How to File ITR Online)
डिजिटलचा या युगात सर्व हळूहळू टेक्नॉलॉजी डेव्हलप होत चालली आहे. हेच कारण आहे की टॅक्सपेयर्स पण आता घर बसून आपला इन्कम टॅक्स रिटर्न ITR करू शकता. यासाठी पहिल्याआधी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ची वेबसाईटवर जाऊन लॉग इन करावे लागेल. टॅक्स पेयर्स ITR फाईल करण्या अगोदर फायनान्शिअल वर्षांमध्ये केली गेलेली कमाई, आधार नंबर आणि पॅन कार्ड हे सर्व्याची माहिती गोळा करायची आहे. पहिल्याआधी इन्कम टॅक्स ई- फाईलिंग पोर्टल eoprtal.incometax.gov.in क्लिक करायचे आहे. नंतर युजर आयडी, पैन नंबर, आधार मार्फत लॉग इन करायचे आहे. त्यानंतर फाईल रिटर्न सिलेक्ट करायचे आहे. एसेसमेंट ईयर आणि ITR चा मध्यम निवडायचे आहे. एप्लीकेशन स्टेटस मध्ये इंडिविजुल आणि लैडिंग पेजवर ITR-1 सिलेक्ट करायचे आहे. ITR करण्याचे कारण सिलेक्ट करून आणि Continue ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. Lets validate your pre-filled return मध्ये जाऊन पर्सनल इन्फॉर्मेशन, टोटल इन्कम, टॅक्स कापणे, टॅक्स जमा करणे आणि द्यायच्या टॅक्स वैलीडेट करा. जर तुम्ही सर्व माहिती अचूक भरली असेल तर, Proceed to Validation वर क्लिक करायचे आहे. Err दाखवत असल्यास एडिट ऑप्शनला सिलेक्ट करायचे आहे. आपली माहिती नवीनच बोलू शकता.
इन्कम टॅक्स स्लॅब म्हणजे काय (What is Income Tax Slab)
इन्कम टॅक्स स्लॅब म्हणजे टॅक्स देणारा व्यक्ती आर्थिक वर्षांमध्ये कमवलेले उत्पन्नावर किती दराने टॅक्स घेतला जाईल याची सर्व माहिती
ITR फाईल करण्याची शेवटची तारीख (Last Date To File ITR)
इन्कम टॅक्स एक्ट 1961 चे सेक्शन 139 (1) अनुसार कोणतीपण कंपनी सोडून बाकी एसेसीज साठी संबंधित एसेटमेंट ईयर (AY) मध्ये इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. म्हणजे पगारातून मिळवणारे जास्त तर इंडीविजूअल, स्मॉल बिजनेस आणि प्रोफेशनल्ससाठी कोणतीपण एसेसमेंट ईयर साठी ITR फाइल करण्याची तारीख 31 जुलै आहे.
इनकम टॅक्स चे प्रकार (Types Of Income Tax)
भारतात इन्कम टॅक्स वेगवेगळ्या नामांवर आणि वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जातो. खाली दिलेले मुख्य प्रकार दिले आहेत.
1) टीसीएस (Tax Collected at the Source)
2) टीडीएस (Tax Deducted at the Source)
3) ॲडव्हान्स टॅक्स
4) संपत्ती कर (Wealth Tax)
5) कॉर्पोरेट टॅक्स
6) प्रोफेशनल टॅक्स
7) कॅपिटल गेन्स टॅक्स
ITR भरण्याचे माध्यम कोणते आहेत (What are the modes of filing ITR?)
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे माध्यम मुख्यता ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने भरता येते. ऑनलाइन पद्धतीने इन्कम टॅक्स भरण्यासाठी तीन पर्याय आहेत. 1) डिजिटल स्वाक्षरीद्वारे DSC ई फायलिंग 2) डिजिटल स्वाक्षरी शिवाय ई फायलिंग 3) इलेक्ट्रॉनिक पडताळणी संहिता EVC अंतर्गत ई-फायलिंग जर इन्कम टॅक्स रिटर्न हा DCS वापर करून, EVC मार्फत ITR नोंदणी केले असेल तर ITR 5 ची स्वाक्षरी केलेली प्रत बेंगलोर CPC ला पाठवण्याची गरज नाही. आणि जर DCSC किंवा EVC व्यतिरिक्त जमा केले असेल तर, निर्धारक ITR 5 बेंगलोर येथे इन्कम टॅक्सचा डिपार्टमेंटला पाठवावे.
आयकर सूट किंवा इनकम टॅक्स सूट म्हणजे काय? (What is Income Tax Exemption or Income Tax Exemption?)
एकूण टॅक्सपात्र उत्पन्न किती आहे. तर त्याच्या अर्थ असा आहे की, वजावट वजा केल्यानंतर जे एकूण उत्पन्न आहे. इन्कम टॅक्स कायद्यानुसार अनेक प्रकारच्या टॅक्स कपाती आहेत. जो व्यक्ती जास्ती जास्त कपात करेल तेवढेच त्या व्यक्तीचे कर दायित्व कमी होईल. इन्कम टॅक्स कलम 80 नुसार 80C, 80D, 80E इत्यादी अंतर्गत अनेक प्रकारच्या टॅक्स कपाती उपलब्ध आहेत. ह्या प्रकारच्या टॅक्स वाचवण्यासाठी आणि दायित्व कमी करण्यासाठी वापरले जातात. पुढे देण्यात आलेले नियम जर व्यक्तीने वाढले तर त्या व्यक्तीला त्याच मध्ये सूट भेटेल.
1) कलम 80C, 80D – ULPS, जीवन विमा, मुदत विमा किंवा आरोग्य विमा मध्ये जमा केलेली रक्कम मधून टॅक्स लागू होत नाही. आणि जर जमा केलेली रक्कम वार्षिक प्रीमियम दीड लाखापेक्षा जास्त नसेल. 2) एखाद्या व्यक्तीने शिक्षणासाठी, घर खरेदीसाठी किंवा व्यवसायासाठी कर्ज घेतले असेल तर त्या कर्जाच्या रकमेवर व्याज भरावे लागत नाही. कलम 10D नुसार टॅक्स सूट देण्यात येतो. 3) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र व सार्वजनिक भविष्य निधी ही टॅक्स फ्री साधने आहेत. यांना कलम 80C नुसार इन्कम टॅक्स सूट आहे. 4) ज्या व्यक्तीची रक्कम बँकेत फिक्स डिपॉझिट मध्ये पाच वर्षापेक्षा जास्त आहे त्या व्यक्तींना सुद्धा इन्कम टॅक्स होत आहे.
आयकर कधी लागू होतो किंवा केव्हा भरावा लागतो (When is income tax applicable or payable?)
आयकर नाव वाचले असता, आपल्याला समजते कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाच्या कर कापला जाऊ शकतो. त्यानंतर कंपन्यांमध्ये महिन्याच्या पगारांमधून सुद्धा कर कापला जातो. त्यानंतर तीन महिन्याचे किंवा वार्षिक उत्पन्न घेण्यासाठी व्यक्तीला बचत योजना किंवा सेवानिवृत्ती योजनेद्वारे जमा केलेल्या पैशांमधून कपात केली जाते.
आयटीआर स्थिती ऑनलाईन कशी तपासायची? (How to check ITR status online?)
इनकम टॅक्स रिटर्न दाखल झाल्यानंतर ITR स्थिती चेक करू शकतो त्याचे दोन मार्ग आहेत.
1) पावती क्रमांकावरून ITR स्थिती चेक करू शकतो. सर्वात आधी ITR वेबसाईटवर जाऊन पेज ओपन झाल्यावर डाव्या बाजूला Services टॅब अंतर्गत ITR Stetus पर्याय सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट झाल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्याच्यावर तुमच्या पॅन ITR पावती क्रमांक व कॅपच्या कोड तिथे टाकायचे आहे. नंतर सर्व माहिती सबमिट करायची आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर ITR Stetus दिसणार आहे.
2) Username आणि Password वापरून ITR Stetus चेक करू शकता. इन्कम टॅक्स रिटर्न ITR ई फाइलिंग पोर्टल वर जाऊन लॉग इन करायचे आहे. त्यानंतर Dashboard वर रिटर्न फॉर्म पाहण्यासाठी पर्याय निवडायचे आहे. त्यानंतर ITR व मूल्यांकन वर्ष निवडायचे आहे आणि सबमिट करायचे आहे. सर्व माहिती सबमिट झाल्यानंतर ITR ची स्थिती स्किनवर दिसणार आहे.
इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याचे फायदे (Benefits of filing Income Tax Return)
खूप वेळा पगार घेणाऱ्या व्येक्टी चा रक्कम इन्कम टॅक्सचा कॅटेगिरी मध्ये येत नाही तरीही काही वेळा TDS कापला जातो. या परिस्थितीमध्ये कापला गेलेला TDS परत मिळवण्यासाठी त्याकरिता ITR देणे अनिवार्य आहे. टॅक्स परताव्याचा दावा दाखल करण्यासाठी ITR दाखल करावा लागतो. त्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्याचे मूल्यांकन करून, व्यक्तीच्या परतावा निघणार असेल तर डिपार्टमेंट त्या प्रकरणावर प्रक्रिया सुरू करते आणि त्यानंतर व्यक्तीच्या कापलेला TDS खात्यात जमा होते.
FAQ. ITR Income Tax Return Information in Marathi ITR Meaning & Mahiti in Marathi
Q. ITR चा फुलफॉर्म? (ITR Full Form?)
Ans. ITR फुलफॉर्म Income Tax Return (इन्कम टॅक्स रिटर्न) असा आहे. आणि याला मराठीत आयकर विवरणपत्र किंवा आयकर रिटर्न असे सुद्धा म्हणतात.
Q. ITR इनकम टॅक्स रिटर्न चे किती प्रकार आहेत? (What is type of ITR)
Ans. टीसीएस (Tax Collected at the Source), टीडीएस (Tax Deducted at the Source), ॲडव्हान्स टॅक्स, संपत्ती कर (Wealth Tax), कॉर्पोरेट टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, कॅपिटल गेन्स टॅक्स.
Q. ITR इनकम टॅक्स रिटर्न चा मराठी अर्थ? (What is Marathi Meaning of ITR)
Ans. ITR ला मराठीत आयकर म्हटले जाते. आणि आयकर म्हणजे व्यक्तीच्या आर्थिक वर्षाचे उत्पन्न मधून कर म्हणून आयकर केंद्र सरकार मार्फत जमा केला जातो आणि या कराचे दर आयकर अधिनियमला अनुसरून ठरवले जात असतात.
Q. रिटर्न्स म्हणजे काय? (What is Return?)
Ans. न्यायालयातील कामकाजाच्या भाषेतून वादीतर्फे दिले जाणारे विवाद प्रतिपादनला रिटर्न स्टेटमेंट असे म्हणतात.
Q. ITR 1 साठी कोण पात्र आहे?
Ans. ज्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न 50 लाख असेल, तर त्या व्यक्तीकडून ITR 1 दाखल केला जातो.
Q. आयकर भरून काय फायदा? (What is Benefits of Income Tax?)
Ans. सरकारचे विविध कामांसाठी व विभागासाठी म्हणजेच रस्ते, शाळा, रुग्णालय, पोलीस व इतर सरकारी खर्चासाठी कर हा सरकारच्या मुख्य माध्यम आहे.
Q. मी माझ्या आयकर रिटर्न्सची पडताळणी कशी करू? (How do I verify my income tax returns?)
Ans. पहिल्या आधी ई-फायलिंग पोर्टलच्या मुख्य पेजवर जाऊन, प्राप्तिकर रिटर्न ITR वर क्लिक करायचे आहे. ITR पेजवर पोचपावती नंबर आणि मोबाईल नंबर टाकून क्लिक करा. 3 री स्टेजवर टाकलेला मोबाईल नंबरचा 6 अंकी OTP आला असेल, तो OTP टाकून सबमिट करून क्लिक करा.
Q. आयकर विवरणपत्र कोणी भरावे? (Who should file income tax return?)
Ans. ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न अडीचलाखापेक्षा जास्त आहे. आणि ज्या व्येक्तीचे वय 60 वर्षे ते 80 वर्षे दरम्यान असेल अश्या व्येक्तींना तीन लाखापर्यंत मर्यादित आहे.
Q. ITR 4 कोन दाखल करू शकतो?
Ans. ज्या व्यक्तीचे निव्वळ उत्पन्न 2021,2022 मध्ये व इतर अटीमध्ये राहून 50 लाखपर्यंत आहे. असे व्येक्ती ITR 4 दाखल करू शकता.
Q. आम्हाला आयकर रिटर्न भरण्याची गरज आहे का? (Do we need to file income tax return?)
Ans. कर भरणे प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. ज्या व्यक्तीचे उत्पन्न दिलेल्या पातळीपेक्षा कमी असेल, ते व्यक्ती स्वेच्छेने रिटर्न भरू शकता. जो करपात्र आहे आणि कर भरला नाही तर आयकर विभागाकडून दंड आकारला जातो.
Q. आयटीआर दाखल करण्याच्या उद्देश काय आहे? (What is the purpose of filing ITR?)
Ans. ITR हा एक फॉर्म आहे. तो फॉर्म व्येक्तीने आयकर विभागाकडे जमा करावा लागतो. त्या फॉर्ममध्ये व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न आणि पूर्ण वर्षाच्या भरावा लागणार कर याची माहिती असते.
Q. किती भारतीय कर भरतात? (How many Indians pay taxes?)
Ans.भारतात कर देणारे व्यक्ती 2020, 2021 मध्ये एकूण 6.94 कोटी आहेत.
Q. 5 लाखापेक्षा कमी आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे का? (Is income tax return required to be filed below 5 lakhs?)
Ans. ज्या व्यक्तीचे उत्पन्न अडीच लाखपेक्षा आहे. त्यांनाही एका रिटर्न भरणे अनिवार्य आहे.
Q. ITR 3 कोण वापरू शकतो?
Ans. ITR 3 फॉर्म हिंदू अविभक्त परिवारासाठी लागू करण्यात आलेला आहे जे व्यवसायातून नफा कमवतात.
Q. 12 लाख पगाराच्या उत्पन्नावर कर कसा वाचवायचा? (How to save tax on 12 lakh salary income?)
Ans. कलम 80C नुसार जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, कर बचत मुदत ठेवी असे पात्र व्यक्ती त्यांच्या कर कमी करू शकता.
Q. 2023 मध्ये कोणती कर व्यवस्था चांगली आहे? (Which tax regime is better in 2023?)
Ans. 2023 अर्थसंकल्पनाने नवीन कर प्रणाली अंतर्गत दर 37% वरून 25% पर्यंत कमी करण्यात आलेला आहे. आणि ज्या व्यक्तीचे उत्पन्न पाच कोटीपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी दर 42.74% वरून 39% पर्यंत कमी होणार आहे.