Raksha Bandhan Information in Marathi Rakshabandhan Mahiti In Marathi

रक्षाबंधन का साजरा केले जाते संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून घ्या | Raksha Bandhan Information in Marathi Rakshabandhan Mahiti In Marathi

Raksha Bandhan Information in Marathi Rakshabandhan Mahiti In Marathi – हिंदू धर्मात खूप सारे सण आहेत जे आपण साजरे करत असतो. त्यातीलच एक रक्षाबंधन. रक्षाबंधन का साजरा केले जाते,रक्षाबंधनाचा इतिहास,रक्षाबंधन साजरा करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट, रक्षाबंधन बद्दल काही पौराणिक कथा व आख्यायिका , रक्षाबंधन पूजा विधि याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. (Rakshabandhan mahiti in marathi. why rakshabandhan celibrate, rakshabandhan muhart, rakshabandhan date 2023, quotes, wishes, sms, whatsapp status,  rakshabandhana chya hardik shubhechha, wishes for brother & sister all information in marathi)

रक्षाबंधन म्हणजे काय? (What is Rakshabandhan In Marathi)

रक्षाबंधन भारतीय संस्कृतीतला एक संस्कार आहे. जो पूर्वीपासून साजरा केला जातो. रक्षाबंधन बहिण भावाचा सण म्हणून ओळखला जातो. तसेच रक्षाबंधन हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा म्हणून साजरा केली जाते. रक्षाबंधन हा बहिण भावाच्या निर्मळ प्रेमाची अशी एक गाठ असते. ही गाठ सोडता सुटत नाही,आणि तोडता तुटत नाही. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते तर भाऊ आपल्या बहिणीला आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हा बहिण भावासाठी अगदी अनमोल दिवस असतो.

रक्षाबंधन बद्दल चा इतिहास (History Of Raksha Bandhan In Marathi)

इतिहासामध्ये असे सांगण्यात येते की 6 हजार वर्षांपूर्वी रक्षाबंधन साजरी करण्यास सुरुवात झाली होती. त्याची उदाहरण खालील प्रमाणे.
ऐतिहासिक काळातील चित्तोडगढच्या राणी कर्णावती या चित्तोडचा राजा ची विधवा होती व त्याच काळात गुजरातचे सुलतान बहादुर शहा यांनी त्यांच्या राज्यावर आक्रमक हल्ला केला. यामुळे राणी कर्णावतीला प्रजेच्या सुरक्षेसाठी मार्ग सापडेनासा झाला . राणी कर्णावतीने बादशाहो हुमायू यांना राखी पाठवली होती. व बादशहा हुमायू ने राणी कर्णावती यांचे बहिणी प्रमाणे बहादुर शहाच्या हल्ल्यापासून रक्षण केले होते.
तसेच दुसरा आलमगीर बादशहा हा दिल्लीवर राज्य करत होता आणि त्यांच्या प्रधानाने त्यांच्याबद्दल काही कट रचून आलमगीर बादशहाचा वध केला व बादशहांच्या मृत शरीराला एका नदीत फेकून दिले त्या ठिकाणी एका महिलेने त्या मृत शरीराला पाण्यातून वाहत पाहून तिने ते बाहेर काढले व मृत शहराच्या बाजूला बसून बराच वेळ सांभाळ केला. त्यानंतर तेथे आलमगीर बादशहाचे सैनिक व त्यांच्यासोबत बादशहाचा पुत्र शहा आलम तिथे आला. शहा आलमने त्या महिलेचा आभार व्यक्त केला आणि तिला आपली बहीण मानले ती हिंदू महिला दरवर्षी शहा आलम यांना राखी बांधू लागली. हि रीत पुढे अकबर शहा व बहादुर शहा यांनीही चालू ठेवली.
अशीच अजून काही उदाहरणे ही रक्षाबंधन बद्दल इतिहास सांगण्यात येतात.

रक्षाबंधन बद्दल पौराणिक कथा किंवा आख्यायिका (Raksha Bandhan Story OR Katha)

भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या सुदर्शन चक्राने जेव्हा शिशुपालचा वध केला होता. तेव्हा सुदर्शन चक्र भगवान श्रीकृष्ण कडे परतले त्यावेळी श्रीकृष्णाचे बोट कापल्यामुळे त्यातून रक्त येत होते. त्यावेळी द्रोपदी ने तिच्या साडीचा काठ फाडून श्रीकृष्णाच्या हाताला पट्टी बांधली होती त्यावेळी श्रीकृष्णाने आश्वासन दिले की संपूर्ण जन्मभर मी द्रौपदीचे रक्षण करीन याच आश्वासनावरून जेव्हा कौरव द्रौपदीचे वस्त्रहरण करत होते. तेव्हा श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण केले. तेव्हापासून श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्या भावाच्या नात्याला रक्षाबंधन म्हणून साजरा करण्यात येते , असे पूर्वी पासून सांगण्यात येते.
अशी आख्यायिका सांगण्यात येते की, बहिणीने भावाला राखी बांधत असताना असे बोलावे.
येणे बंधू बळीराजा दानवेंद्र महाबल:| तेन त्वामनुबध्नमी रक्षे मा चल मा चल ||
याचा अर्थ असा की दानवांचा राजा बली यांच्या हातात दैत्य गुरु शुक्राचार्य यांनी जशी रक्षा म्हणजेच राखी बांधली होती तशीच ही राखी मी तुझ्या हाताला बांधत आहे.

रक्षाबंधनाचे धार्मिक महत्त्व (Religious of Rakshabandhan)

श्रावण महिन्यातील पौर्णिमेला ” श्रावणी “असे सुद्धा म्हटले जाते. पूर्वी पावसाळा सुरू झाल्यानंतर पाऊस पडला की लोक खूप आनंदी व्हायची आणि आनंदने व समाधानाने धार्मिक वेध पुराणांची कथा किंवा पूजा किंवा सप्ताह असे उत्सव साजरे करायचे. तर पूर्वीच्या काळात राजकुमारांना शिक्षण देण्यासाठी मुहूर्त काढला जात असायचं . तर तो मुहूर्त काढण्याचे कारण असे अध्ययनाचा प्रारंभ, शौर्याचे शुभचिन्ह या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी व यांचे आचरण करण्यासाठी श्रावणी साजरा करणे . तर श्रावण नक्षत्रात श्रावणी साजरी करतात असे मानले जायचे म्हणजेच बहीण भावाची अतूट बंधन हा सण करून व्यक्त करत असायच्या.

रक्षाबंधन साजरी करण्यामागे सामाजिक उद्दिष्टे काय आहे. (What is the Reason of Rakshabandhan Celibration)

रक्षाबंधन साजरी करण्यामागे उद्दिष्ट आहेत की, भारतीय संस्कृतीतले अनेक धर्मांचे लोक हे एकत्र आलेले असतात. यामुळे सामाजिक बंधुता आणि एकता निर्माण होते. व काही कुटुंबातील लोक एकत्र येतात यांच्या नात्यातील गोडवा वाढतो व नाती घट्ट होतात .व काही कारणास्तव झालेले मतभेद किंवा रुसवा त्यांच्या त गोडवा निर्माण होतो. तसेच या सणामुळे काही पर गावाचे किंवा गावातले नातेवाईक यांच्याशी भेटीगाठी होतात. म्हणून रक्षाबंधन सारखी सण साजरी केले जातात.

भारतामध्ये कोणत्या राज्यांमध्ये रक्षाबंधन साजरा केले जाते (Rakshabandhan is celebrated in which states in India?)

दक्षिण भारत (South India)

दक्षिण भारतामध्ये रक्षाबंधनाला अवनी अबिथम या नावाने ओळखतात. या दिवशी त्या ठिकाणी ब्राह्मण यासनाला खूप जास्त महत्त्व देतात कारण या दिवशी ते स्नान केल्यानंतर मंत्र पाठासह त्यांच्या गळ्यातले जानवे किंवा पवित्र धागा हे बदलत असतात.

पश्चिम घाट (Western Ghats)

या दिवशी वरून देवाला नारळ अर्पित करून रक्षाबंधन साजरी केली जाते .म्हणून या ठिकाणी राखी पौर्णिमेला” नारळी पौर्णिमा “असे म्हणून ओळखले जाते.

उत्तर भारत (North India)

उत्तर भारतात “कजरी पौर्णिमा” म्हणून रक्षाबंधन साजरा केला जातो . या दिवशी गहू आणि ज्वारी व इतर धान्य पसरवली जातात. आणि धरती मातेची पूजन केले जाते व चांगल्या पिकासाठी प्रार्थना केली जाते.

गुजरात (Gujarat)

या ठिकाणची लोक श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवलिंग वर पाणी अर्पण करतात व या दिवशी येथील लोक पंच कव्य मध्ये कापूस भिजवतात व शिवलिंग होते बांधत असतात. या पूजेला ते पावितो पन्ना असे म्हणतात.

रक्षाबंधनाचा पूजा विधि (Puja Method of Rakshabandhan)

यामध्ये लागणारी पूजा विधी साठीची सामग्री अगदी थोडी आणि सोपी आहे यामध्ये तेल चा दिवा आणि कापसाची वात थोडे तांदळाचे दाणे थोडासा कुंकू आणि राखी व कोणताही एक गोड पदार्थ इत्यादी या सर्व वस्तू एका ताटात ठेवून ही पूजा केली जाते.

रक्षाबंधन 2023 शुभ मुहूर्त (Rakshabandhan 2023 auspicious time)

अधिक मास असल्यामुळे या वर्षी रक्षाबंधन उशिरा आहे.
रक्षाबंधन श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथी ला साजरी केली जाते.
30 ऑगस्ट 2023 सकाळी 10:58 पोर्णिमा चालू होईल. तर 31 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 07:05 पर्यंत परंतु पौर्णिमेसोबतच भद्रा काळ पण सुरू होणार आहे . तर भद्रा काळ मध्ये राखी बांधली जात नाही. भद्रकाल हा 30 ऑगस्ट 2023 रोजी भद्रा काळ रात्री 09:02 पर्यंत राहील. म्हणून राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त.
शुभ मुहूर्त 30 ऑगस्ट 2023 रात्री 09:05 ते 31 ऑगस्ट 2023 सकाळी 07:05 पर्यंत राहील.

भद्रा काळ म्हणजे काय? (What is Bhadra Kaal?)

भद्रा ही सूर्य देवाची कन्या आणि शनि देवाची बहीण आहे तिचे लांब केस आणि काळा रंगाची दात. तिच्या या स्वरूपामुळे तिला हिंदू पंचांगात विशेष जागा मिळाली आहे. भद्रा तिच्या जन्मावेळी पूर्ण विश्वाला तिचे भोजन बनवणार होती. यामुळे सर्व पूजा यज्ञ सन किंवा शुभ कार्यांमध्ये अडथळा येऊ लागला. त्यावरून ब्रह्मदेवाने तिला समजावले आणि अकरा करण्यामध्ये 7 करण म्हणून तिला स्थान देण्यात आले.
भद्रा काळ अमंगल किंवा अशुभ काळ मानला जातो. त्यामुळे भद्रा काळात कोणतेही चांगली कामे करू नये. भद्राच्या शरीराच्या भागांवरून शुभ आणि अशुभ कामांची विभाजन केले जाते. ज्योतिष शास्त्रावरून भद्राचे मुख कंठ आणि हृदय हे पृथ्वीवर असते त्यामुळे भद्रा काळात कोणतीही चांगली कामे करू नये.

रक्षाबंधनाचे महत्त्व काय आहे? (What is the significance of Raksha Bandhan?)

भारतीय संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन सन साजरा केला जातो तरी या दिवशी उत्तर भारतात राखी म्हणून ओळखला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावा ला राखी बांधून भावाची दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आपल्या भावाला सर्व दुखांपासून दूर ठेवण्यासाठी देवाला प्रार्थना करते आणि सुखी व समृद्ध होण्यासाठी त्याचे औक्षण करते.

रक्षाबंधन निमित्त शुभेच्छा (Happy Raksha Bandhan Wishes)

1) एक नात विश्वासाच एक नातं प्रेमाचं ,
रक्षाबंधन भावा बहिणीच्या पवित्र नात्याच्या
हार्दिक शुभेच्छा…..!
2) जडणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ
नेहमी माझ्या मनात दादांना भेटण्याची आस..!
रेशमी धाग्यात रंग आहे प्रेमाचा वसल्या,
आपुलकी ,जिव्हाळ्याचा…
3) दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचं शिकार
गाठत रहा हीचं इच्छा…
राखी पौर्णमेच्या शुभेच्छा!
4) हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन
जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी राहशील
माझ्या जवळ,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
 5) चंदनाचा टिळा,हाती रेशमी धागा
श्रावणाची सर, आनंदाची बहर
भावा बहिणींच्या आनंदाचा हा सण
सर्वांना हॅपी रक्षाबंधन…!

FAQ : Raksha Bandhan Information in Marathi Rakshabandhan Mahiti In Marathi

1. रक्षाबंधन कोणाचा सण असतो? (Whose festival is Rakshabandhan?)
उत्तर. बहीण भवाचा सण असतो.
2. रक्षाबंधन का साजरा केला जातो? (Why is Rakshabandhan celebrated?)
उत्तर. बहिण भावाच्या नाते घट्ट व त्यातील गोडवा कायम राहील यासाठी.
3. या दिवशी बहिण भावाला राखी का बांधते?
उत्तर. भावाकडून बहिणीचे रक्षणाचे प्रतीक म्हणून मानली जाते.
4. भारतामध्ये किती राज्यात रक्षाबंधन साजरा केला जातो?
उत्तर. पश्चिम घाट, उत्तर भारत ,गुजरात आणि दक्षिण भारत .
5. रक्षाबंधनाचे सामाजिक उद्दिष्टे काय?
उत्तर. भारतीय संस्कृतीतील सामाजिक बंधुता आणि एकता निर्माण करणे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top