PM Vishwakarma Yojana Information In Marathi – आपल्या भारत देशाचा 77 व्या स्वातंत्र्य दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर भाषण देत असताना देशवासीयांना संबोधित करताना असे सांगितले की, येत्या सप्टेंबर महिन्यात विश्वकर्मा जयंती निमित्त आपल्या भारत देशात विश्वकर्मा श्रम कौशल सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. ती योजना सुरू झाली असून, या योजनेअंतर्गत देशातील पात्र नागरिकांना अनेक प्रकारच्या फायदा होणार आहे. नेमकी विश्वकर्मा कौशल सन्मान योजना काय आहे या बाबतची सर्व माहिती तसेच PM प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेचा फायदा, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेसाठी पात्रता, PM विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, विश्वकर्मा श्रम सन्मान योजनेसाठी अर्ज कसा करावा, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सन्मान योजना नोंदणी झाल्यावर Log in करण्याची पद्धत, आणि PM विश्वकर्मा श्रम सन्मान योजना फॉर्मची स्थिती चेक करण्याची पद्धत ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
(Pradhanmantri Vishwakarma yojana 2024 all information in marathi. Vishwakarma scheme required documents list and eligibility criteria and online application form fillup process in marathi)
PM Vishwakarma Yojana 2024 Overview
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
योजना | पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
घोषणा कोणी केली | वित्त मंत्री निर्मला सीतारमण |
वर्ष | 2023 |
योजनेची सुरुवात केव्हा झाली | 17 सप्टेंबर 2023 |
योजनेचा उद्धेश | विश्वकर्मा समजतील लोकांना प्रशिक्षण, मार्केटिंग आणि उत्पादन वाढण्यासाठी आर्थिक मदत देणे |
लाभार्थी | देशातील पारंपारिक कलाकार आणि कारागीर |
योजनेचा लाभ किती लोकांना होणार आहे | 30 लाख लोकांना |
योजनेचा बजेट | 13 हजार कोटी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन ( CSC Center) |
अधिकृत वेबसाईट | https://pmvishwakarma.gov.in |
टोल फ्री नंबर | 18002677777 |
G20 शिखर परिषद काय आहे, समजून घ्या येथे सोप्या भाषेत
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सन्मान योजना म्हणजे काय (What is Vishwakarma yojana 2024)
विश्वकर्मा श्रम सन्मान योजना अंतर्गत आपल्या देशातील लहान व्यवसाय करणाऱ्यांना आणि कारागिरांना खूप मोठा फायदा होणार आहे. या योजने करिता भारत सरकार 13 हजार ते 15 हजार कोटी रुपयांची खर्च करणार आहे. विश्र्वकर्मा श्रम सन्मान योजना मार्फत देशातील 18 पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना जसे की, गवंडी, सोनार, कुंभार, मूर्तिकार, चांभार, सुतार, हलवाई, कोळी, विणकर, रेशीम कारागीर, लोहार, धोबी, न्हावी व इतर व्यवसाय कारगिरांना 15 हजार कोटी रुपयांची व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत तसेच अनुदानित कर्ज, व्यवसाय प्रशिक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्याची परिपूर्ण माहिती सुद्धा देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी असे सांगितले की, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना मार्फत व्यवसाय करागिराला एका प्रकारच्या आधार दिला जाणार आहे. ज्याच्यामुळे असंघटित छोटे कारागीर त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारू शकतील. तसेच या योजनेमार्फत ओबीसी वर्गातील कामगारांना चांगली मदत मिळणार आहे. 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस निमित्त पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची सुरु करण्याची घोषणा केली. तसेच या योजनेअंतर्गत 140 जातींचा समावेश केला जाणार आहे.
विश्वकर्मा योजनेचा उद्दिष्टे (Vishwakarma yojana udishte)
PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या भारत देशातील पारंपारिक कारागीर, कलाकार तसेच व्यवसायिक कामगार चांचे उत्पन्न वाढण्याकरिता आर्थिक मदत करणे आहे. त्यामुळे ते केवळ त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार नाही तर MSME मूल्य साखळी मार्फत उत्पादनाची वाढ आणि सुलभता सुधारण्यास सक्षम करणारं आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक मदत सोबत पारंपारिक कारागिरांना नवीन तंत्रासाठी प्रशिक्षणासाठी निधी सुद्धा दिला जाणार आहे. या योजनेचा माध्यमातून आपल्या भारत देशातील सर्व कारागिरांना प्रोत्साहन दिले जाणार आहे तसेच कारागिरांना वेगवेगळ्या पारंपारिक कौशल्य दाखवण्यासाठी नवीन तांत्रिक सुविधांचा लाभ मिळणार आहे. भारत सरकार यांचा मते कारागीर कोणत्याही क्षेत्रातील असेल, त्या कारागीर मध्ये कौशल्य असणे आवश्यक आहे. कारण खूप वेळा कारागिरांना योग्य ते प्रशिक्षण मिळत नाही तसेच जे अनुभवी आहेत अशा कारागीर यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने कारागीर त्यांचे जीवनमान सुधारू शकत नाही त्यामुळे केंद्र सरकारने विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची सुरुवात केली. या योजेअंतर्गत कारागिरांना आवश्यक प्रशिक्षण आणि ज्यांचा कडे पैसे नसतील असा कारागिरांना भारत सरकार कडून पैसे मिळणार आहेत. असा पद्धतीने विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजने मार्फत कारागिरांना प्रशिक्षण सोबत आर्थिक मदत सुद्धा मिळणार आहे. ज्यामुळे विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेसाठी पात्र कारागीर त्यांचे जीवनमान उंचावतील तसेच देशाचा प्रगतीसाठी हातभार लावतील.
GDP म्हणजे काय येथे पहा सविस्तर माहिती
PM प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेचे फायदे (Vishwakarma yojana benefits)
1) देशातील, राज्यातील, शहरी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या पारंपारिक व्यवसाय पात्र कारागिरांना प्रधानमंत्री विश्वकर्मा श्रम कौशल्य सन्मान योजनेचा फायदा होणार आहे.
2) या योजनेअंतर्गत दरवर्षाला 15 हजार कारागिरांना कामावर घेतले जाणार आहे.
3) या योजनेअंतर्गत करागिरांना प्रशिक्षण देत असताना त्यांची राहण्याची तसेच खाण्याच्या खर्च केंद्र सरकार करणार आहे.
4) या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, पारंपारिक सर्व पात्र कारागिरांना त्यांच्या कौशल्य आणि व्यवसायाकरिता प्रगट प्रकारचे टूलकिट सुद्धा दिले जाणार आहे.
5) या योजनेअंतर्गत पारंपारिक कारागीर जसे की, सुतार, शिंपी, विणकर, न्हावी, सोनार, लोहार, कुंभार, चांभार, मिठाई बनवणारा व इतर करागिरांना 6 दिवसाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
6) या योजनेअंतर्गत पात्र व्यावसायिक कारागिरांना 10 हजार ते 10 लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत सुद्धा दिली जाणार आहे.
7) योजनेअंतर्गत पात्र पारंपरिक व्यवसाय कारागीर त्यांची आर्थिक परिस्थिती म्हणजेच जीवनमान सुधारू शकतील.
8) या योजनेअंतर्गत कारागिरांना अधिक कौशल्य कसे मिळेल याकडे जास्त लक्ष दिले जाणार आहे.
9) या योजनेअंतर्गत पारंपारिक कामगारांना नवीन उपकरणे आणि डिझाईन ची माहिती मिळावी याकरिता कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
10) या योजनेअंतर्गत पारंपारिक कारागिरांना अजूनही खूप करणे खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार मार्फत आर्थिक मदत सुद्धा केली जाणार आहे.
11) या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना केंद्र सरकारकडून स्टायपेंड 500 रुपये प्रतिदिन दिला जाणार आहे.
12) या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्याला 1 लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाणार आहे. या कर्जावर जास्तीत जास्त 05 टक्के व्याजदर असणार आहे. दुसऱ्या टप्प्याला पात्र कारागिरांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची सवलती कर्ज दिले जाणार आहे.
13) या योजनेअंतर्गत पात्र कारागीर आणि कामगारांना पीएम विश्वकर्मा श्रम सन्मान कौशल्य योजनेचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र सुद्धा दिले जाणार आहे.
14) योजनेअंतर्गत पारंपारिक कारागिरांना आणि कामगारांना काम करताना लागणारी आधुनिक उपकरणे खरेदी करण्याकरिता सुद्धा 15 हजार रुपये दिले जाणार आहेत.
15) या योजनेअंतर्गत 30 लाख असंघटित कारागिरांना आणि कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.
16) या योजनेअंतर्गत कारागिरांना आणि कामगाराला प्रशिक्षण करिता संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेसाठी पात्रता (Eligibility Criteria)
1) अर्जदार पारंपरिक कारागीर असावा.
2) अर्जदार अल्प उत्पन्न श्रेणीतील कारागीर असावा.
3) अर्जदार ओबीसी श्रेणीतील कारागीर असावा.
4) अर्जदार हस्तकला कामगार असेल तर या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकणार आहे.
5) अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.
6) अर्जदाराची वय 18 वर्षे पूर्ण असावे.
7) अर्जदार पारंपारिक कारागीर असावा. जसे की विणकर, सुतार, शिंपी, लोहार, कुंभार, चांभार व इतर
8) योजनेच्या लाभ घेण्यासाठी शिक्षण पात्रतेची आवश्यकता नाही आहे.
9) योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदाराने केंद्र किंवा राज्य सरकारकडून मागील दोन वर्षात टूल किट संबंधात कोणताही लाभ घेतलेला नसावा.
10) पारंपारिक कारागीर जातीपेक्षा वेगळे जसे की, कार्य कौशल्यशी संबंधित कारागीर असतील. त्यांना पुरावा म्हणून अध्यक्ष नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका अंतर्गत दिलेले प्रमाणपत्र द्यावे लागेल.
11) या योजनेअंतर्गत अर्जदार कुटुंबातील एकच व्यक्ती अर्ज करू शकतो.
12) या योजनेत विश्वकर्मा समाजाचा अंतर्गत येणाऱ्या 140 जाती अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
लेक लाडकी योजना अर्ज करण्याची सोपी पद्धत आणि कागदपत्रे येथे पहा
विश्वकर्मा योजनासाठी पात्र असलेले व्यवसाय
1) लाकूड आधारित – सुतार (सूथार), बोट मेकर
2) सोने/चांदीवर आधारित – गोल्डस्मिथ (द्वारे सादर)
3) क्ले आधारित – कुंभार (कुम्हार)
4) लोह/धातुवर आधारित/दगडावर आधारित – आर्मरर, लोहार, हॅमर आणि टूल किट मेकर, लॉकस्मिथ, शिल्पकार (मूर्तिकार, दगड कोरणारा, दगड तोडणारा)
5) लेडर बेस्ड – मोची (चर्मकार), चपला (पादत्राणे कारागीर)
6) इतर – बास्केट, चटई, झाडू मेकर, कॉयर विणकर बाहुली आणि खेळणी मेकर, नाई, शिलाई, माळा मेकर, वाशरमन, शिंपी (दरजी), फिशिंग नेट मेकर, कास्य, पितळ, तांबे, डायस, भांडी, (मूर्ती) इ.
PM विश्वकर्मा योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Required Documents List in marathi)
विश्वकर्मा श्रम सन्मान योजनेसाठी अर्ज करायचे असेल तर, तुमच्याकडे लागणारी आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. योनी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहेत.
1) आधार कार्ड (तुमच्या मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असावा)
2) रहिवासी दाखला
3) पॅन कार्ड
4) ओळखपत्र
5) पत्त्याचा पुरावा
6) मोबाईल नंबर
7) जातीचा दाखला (जात प्रमाणपत्र)
8) बँक खाते पासबुक
9) अधिवास प्रमाणपत्र
10) शिधापत्रिका प्रत
सूचना – पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा फॉर्म CSC केंद्रातच भरला जाणार आहे.
कल्की म्हणजे काय, कल्की अवतार माहिती येथे पहा
विश्वकर्मा श्रम सन्मान योजनेसाठी अर्ज कसा करावा (How to apply online)
पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची सुरुवात झाली असून, योजनेसाठी अर्ज करण्याकरिता CSC केंद्रात जाऊनच अर्ज करू शकता. तुम्ही स्वता मोबाईल अर्ज करू शकणार नाही. या योजनेचा फॉर्म CSC केंद्रात भरण्याकरिता खाली देण्यात आलेल्या स्टेपचा वापर करावा.
1) सर्व प्रथम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन करायची आहे.
2) त्यानंतर मुख्य पेज ओपन होईल. तिथे how to register ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
3) त्यानंतर तिथे नोंदणी करिता स्क्रीनवर माहिती दिली असेल. ती माहिती वाचून त्यानुसार योजनेसाठी फॉर्म भरण्या करिता तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड verify करायचे आहे.
4) त्यानंतर तुमचा समोर लाभार्थी नोंदणी फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती अचूक पद्धतीने भरायची आहे.
5) तसेच लागणारी आवश्यक कागदपत्रे upload करायची आहेत. त्यानंतर Submit या बटनावर क्लिक करायचे आहे.
6) अशा प्रकारे तुम्ही विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेसाठी अर्ज करू शकता.
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सन्मान योजना नोंदणी झाल्यावर Log in करण्याची पद्धत
1) सर्वात आधी येण्याचे अधिकृत वेबसाईट ओपन करायची आहे.
2) अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यावर मुख्य पेज ओपन होईल.
3) होम पेजवर विश्वकर्मा श्रम सन्मान योजना या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
4) क्लिक केल्यानंतर पेजवर नोंदणीकृत वापर करताना लॉगिन दिसेल.
5) या लॉगिन अर्जामध्ये युजर नेम, पासवर्ड आणि कॅपच्या कोड भरायचा आहे.
6) त्यानंतर लॉगिन बटनावर क्लिक करायचे आहे.
7) अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना नोंदणी झाल्यावर लॉगिन करू शकता.
PM विश्वकर्मा योजना फॉर्मची स्थिती चेक करण्याची पद्धत (How to check status)
1) सर्वात आधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
2) अधिकृत वेबसाईट ओपन केल्यावर मुख्य पेज ओपन होईल.
3) त्यानंतर पेजवर विश्वकर्मा श्रम सन्मान योजना या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
4) त्यानंतर लॉगिन करायचे आहे.
5) त्यानंतर पेजवर जास्ती स्थिती तपासण्यासाठी पर्याय दिसेल त्यात अर्ज क्रमांक भरायचा आहे.
6) त्यानंतर अर्जाची स्थिती पाण्यासाठी खाली बटणावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तिथे अर्जचा स्टेटस ओपन होईल.
7) अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना नोंदणी झाल्यावर अर्जाची स्थिती बघू शकता.
ITR इनकम टॅक्स रिटर्न म्हणजे काय आणि ITR कसा भरावा येथे सोप्या भाषेत समजून घ्या
FAQ. PM Vishwakarma Yojana 2024 Information In Marathi
Q. Vishwakarma sharm Kaushal Sanman yojana application form official website?
Ans. https://pmvishwakarma.gov.in
Q. विश्वकर्मा श्रम सन्मान योजनेसाठी पात्र कारागीर?
Ans. विश्वकर्मा श्रम सन्मान योजनेसाठी पात्र कारागीर तसेच कामगार कोण असतील या बाबतची सविस्तर माहिती वरती लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.
Q. विश्वकर्मा श्रम सन्मान योजना महाराष्ट्र माहिती इन मराठी?
Ans. विश्वकर्मा श्रम सन्मान योजनेची सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुमचा मोबाईल मध्ये विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना 2023 by Information in marathi.com सर्च करा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल.
Q. विश्वकर्मा श्रम सन्मान योजना 2024 साठी किती वयाची आवश्यकता आहे?
Ans. विश्वकर्मा श्रम सन्मान योजना 2024 साठी उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
Q. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना 2024 सुरू झाली आहे का?
Ans. हो. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची सुरुवात 17 सप्टेंबर 2023 झाली आहे.
Q. प्रधानमंत्री श्रम सन्मान योजनेमार्फत कर्ज मिळते का?
Ans. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना अंतर्गत कारागिरांना व्यवसायाकरिता कर्ज 5 टक्के व्याज दराने दिले जाणार आहे.
Q. विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना 2024 मार्फत प्रशिक्षण कोणत्या प्रकारचे दिले जाणार आहे?
Ans. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना अंतर्गत पात्र पारंपारिक कामगारांना कामाचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Q. प्रधानमंत्री विश्वकर्मा श्रम कौशल्य योजनेचा उद्देश काय आहे?
Ans. आपल्या भारत देशातील पारंपारिक व्यवसायाच्या व्यापार वाढवा आणि पारंपारिक कारागीर आणि कामगारांचे जीवनमान सुधारावे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
Q. प्रधानमंत्री विश्वकर्मा कशाला सन्मान योजना अंतर्गत कोणाला जास्त फायदा होणार आहे?
Ans. विश्वकर्मा श्रम सन्मान योजना अंतर्गत गरीब कौशल्य कारागिरांना जास्त फायदा होणार आहे.
Q. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना अंतर्गत किती कर्ज मिळेल?
Ans. विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना अंतर्गत कारागिरांना व्यवसाय करिता 1 ते 3 लाख पर्यंत 5 टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे.
Q. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्या सन्मान योजना अंतर्गत किती अनुदान दिले गेले आहे?
Ans. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना अंतर्गत 13 हजार कोटी रुपये 2023 साठी अनुदान दिले गेले आहे.
Q. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेचे मुख्य घटक?
Ans. सतत देखरेख, आधीच्या शिक्षणाची ओळख, कमी वेळात प्रशिक्षण प्लेसमेंट सहाय्यक, विशेष प्रकल्प, कौशल्य आणि रोजगार मेळावा, प्रामाणिक ब्रँडिंग आणि कम्युनिकेशन स्किल हे मुख्य घटक आहे.