Share Market Information In Marathi

Share Market संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून घ्या | Share Market Information in Marathi Share Market Mahiti In Marathi

Share Market Information in Marathi Share Market Mahiti In Marathi : शेअर मार्केट म्हणजे एक असे ठिकाण की ज्यामध्ये अगदी साधारण व सामान्य लोक देखील शेअर मार्केटची जोडू शकतात. तर शेअर मार्केट म्हणजे काय ?शेअर मार्केटचा मुद्दा काय आहे?स्टॉक मार्केट म्हणजे काय? शेअर म्हणजे काय? स्टॉक मार्केट आणि शेअर मार्केट मधील फरक ? मार्केट म्हणजे काय ?शेअर मार्केट कसे काम करते? व शेअर मार्केट कसे शिकाय चे ?शेअर मार्केट शिकत असताना कोणती काळजी घ्यावी?. आणि ट्रेडिंग म्हणजे काय ? NSE व BSE म्हणजे काय ? NSE आणि BSE यांच्यातील फरक? सेबी म्हणजे काय? सेबीचे प्रकार? तसेच शेअर मार्केट शिकण्यासाठी काही पुस्तकांची नावे? व शेअर मार्केट संबंधित काही शब्द? याबद्दल माहिती आपण या लेखाद्वारे समजून घेणार आहोत अगदी साध्या व सोप्या भाषेत.

 

अनुक्रमाणिका

शेअर मार्केट म्हणजे काय (What is Share Market Information in Marathi)

शेअर मार्केट किंवा शेअर बाजार कुठल्याही देशाच्या विकसित अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे देशातील मोठ्या औद्योगिक व्यवसाय कंपन्या चालवण्यासाठी जो पैसा लागत असतो त्यासाठी कंपन्या किंवा व्यावसायिक शेअर मार्केटमध्ये येत असतात.शेअर मार्केट म्हणजे एक असा बाजार आहे जिथे गुंतवणूक करणारे कंपनीचे शेअर्स खरेदी आणि विक्री करत असतात यामध्ये गुंतवणूकदार ज्या कंपनीचे शेअर्स विकत घेत असतात त्या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची काही टक्क्याची भागीदारी होत असते कोणत्याही व्यक्ती हा ज्या कंपनीचे शेअर खरेदी किंवा विक्री करत करतात त्याला गुंतवणूकदार असे म्हणतात.शेअर मार्केट असे ठिकाण आहे जेथे गुंतवणूक करणारा ब्रोकरच्या साह्याने एनएसई किंवा बीएससी या स्टॉक एक्सचेंज कंपनीमध्ये सूचीबद्ध कंपन्यांची शेअर खरेदी किंवा विक्री करू शकतात. शेअर मार्केट ला स्टॉक मार्केट म्हणूनही ओळखले जाते. शेअर मार्केटमध्ये शेअर ची खरेदी व विक्री किंवा गुंतवणूक हे पैशाने केली जाते.

 

शेअर्स म्हणजे काय?

शेअर म्हणजे एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी केले म्हणजेच त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर त्या कंपनीमध्ये त्या शेअरची जेवढी किंमत असेल तितके त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची मालकी किंवा भागीदारी होत असते. म्हणजेच जर एखाद्या कंपनीचे भांडवल हे 100 कोटी असेल. व त्या भांडवलाचा 1 कोटी भागांमध्ये जर विभाजन केले तर त्याचे 1कोटी शेअर तयार होतील. आणि त्या 1 कोटी शेअर्सची प्रत्येकी एका शेअरची किंमत ही 100 रुपये एवढी राहील. म्हणजेच जर का त्या कंपनीचा एक शेअर विकत घेतला तर त्या कंपनीत एक टक्क्याची भागीदारी किंवा मालकी मिळत असते.

 

शेअर्सची एकूण तीन प्रकार पडतात

1. इक्विटी शेअर
एखादी कंपनी स्टॉक एक्सचेंज मध्ये सूचीबद्ध शेअर्स जारी करते तेव्हा त्यास इक्विटी शेअर्स असे म्हणतात. तर दुसऱ्या शेअरच्या तुलनेत इक्विटी शेअर हे सर्वाधिक विक्री केले जातात. कारण हे इक्विटी शेअर जवळ जवळ सर्व कंपन्यांनी दिलेले असतात.

 

2. प्रेफरन्स शेअर
प्रेफरन्स शेअर व इक्विटी शेअर या दोघांमध्ये काही जास्त फरक नसतो., परंतु या दोघांमध्ये थोडा फरक असतो प्रेफरन्स शेअर होल्डर कंपनीच्या बैठकीत कधीच मत देऊ शकत नाही कारण प्रेफरन्स शेअर होल्डरला तेवढा हक्क दिला नसतो. प्रेफरन्स शेअर होल्डरला मिळणारा नफा तो शेअर घेतल्या वेळीच निश्चित केलेला असतो .वर्षाच्या शेवटी तो त्याला मिळत असतो त्यामुळे प्रेफरन्स शेअर इक्विटी शेअर पेक्षा वेगळाअसतो.

 

3. डीव्हीआर शेअर
डीव्हीआर शेर हा इक्विटी व प्रेफरन्स यांच्यापेक्षा वेगळा असतो कारण यामध्ये शेअर होल्डरला इक्विटी शेअर सारखा फायदा होत असतो परंतु त्याला मत देण्याचा हक्क मिळत नाही मत देऊ शकतात पण त्यांचा मतदान हक्क हा निश्चित केलेला असतो ज्याला मत देण्याचा हक्क दिला जाईल तोच डीव्हीआर शेर होल्डर मत करू शकतो.

 

स्टॉक मार्केट म्हणजे काय? (What is stock market)

स्टॉक मार्केट यालाच स्टॉक एक्सचेंज म्हणून ओळखले जाते स्टॉक मार्केट ही एक अशी जागा आहे जेथे स्टॉक इक्विटी आणि सिक्युरिटी व बॉण्ड हे त्वरित व्यापार करत असतात.स्टॉक मार्केट सुरक्षित आणि नियंत्रित मार्गाने व्यापार करण्यासाठी एक चांगली पायाभूत सुविधा देत असते. स्टॉक मार्केट हे स्टॉक विक्रेते आणि खरेदी करणारे यांना एकत्रित आणते आणि सिक्युरिटी आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी हे भारतातील स्टॉक एक्सचेंज नियंत्रित करते म्हणून व्यवहारांमध्ये जास्तीची किंमत आणि पारदर्शकता निश्चित केली जाते स्टॉक एक्सचेंज सूचीबद्ध नसल्यामुळे एखादा स्टॉक विकत घेता व विक्री करता येत नाही.स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक ब्रोकर्स काही एकत्र कंपन्या सिक्युरिटीज आणि बॉंड्स हे व्यापार करत असतात यामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे भारतातील दोन मुख्य स्टॉक एक्सचेंज कंपन्या आहेत तर बाजारातील सहभागांची मागणी व पुरवठा यांच्या बद्दल माहिती ठेवते आणि त्यानुसार याची किंमत निश्चित केली जाते

 

शेअर मार्केट आणि स्टॉक मार्केट यामधील फरक (difference between share market and stock market)

शेअर मार्केट आणि स्टॉक मार्केट हे जरी एकमेकांचे पूरक असले तरी त्यांची कामेही वेगवेगळी असतात शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट ही बाजारपेठ असतात .जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या बॉण्ड्स आणि सिक्युरिटीज यांच्यात व्यवहार होत असतो तर कंपनीच्या स्टॉक ची किंमत ही त्या स्टॉकच्या मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते .तर एखादी कंपनी डायरेक्ट शेअर विकू शकते परंतु स्टॉक विकू शकत नाही कारण जेव्हा अनेक शेअर्स हे एकत्रित करून ठेवले जातात. तेव्हा त्यांना स्टॉक असे म्हणतात तर शेअरची किंमत कमी असू शकते परंतु स्टॉक मध्ये नेहमीच किंमत जास्त असते शेअर आणि स्टॉक यांच्यात त्यांच्या किमतीचाच फरक असतो.

 

मार्केट म्हणजे काय? (What is market marathi)

मार्केट म्हणजेच बाजार तर बाजार म्हणजे वस्तू खरेदी आणि विक्री करण्यासाठी खरेदीदार आणि विक्री करणारा हे दोन व्यक्ती एका ठिकाणी जमलेले असतात म्हणजेच बाजार किंवा मार्केट होय तसेच बाजारात दुकाने किंवा भाजीपाला असू शकतो आणि वस्तूची खरेदी आणि विक्री होऊ शकते तसेच हा एक ऑनलाईन बाजार किंवा मार्केट देखील असू शकते त्यामध्ये स्वतः उपस्थित नसताना देखील खरेदी आणि विक्री केली जाते मार्केट हे सिक्युरिटीज असणाऱ्या ठिकाणांना सूचित करत असते या प्रकारच्या मार्केट किंवा बाजार यांना रोखे असे ओळखले जाते.बाजारातील व्यवहारांमध्ये वस्तू सेवा चलन माहिती या सर्व घटकांची एकत्रित अस्तित्व असते बाजार हा भौतिक ठिकाणी असू शकतो जिथे व्यवहार केले जातात जसे की ऑनलाईन मार्केट प्लेस मध्ये फ्लिपकार्ट ॲमेझॉन इत्यादी बाजार किंवा मार्केट यांचा आकार खरेदी आणि विक्रेती करणाऱ्यांच्या संख्येवर अवलंबून असतो.

 

मार्केट किंवा बाजार याचे प्रकार (types of market)

1. काळाबाजार
काळाबाजार हा बेकायदेशीर आणि त्यामध्ये सरकार किंवा सरकारी प्राधिकरणाच्या माहिती व्यतिरिक्त व्यवहार केले जातात. अनेक काळे बाजार असतात ज्यामध्ये फक्त रोख व्यवहार किंवा वेगवेगळ्या प्रकारचे चलनांचा समावेश असतो त्यामुळे त्याच्याबद्दल माहिती मिळवणे सोपे नसते काळाबाजार त्या ठिकाणी अस्तित्वात असतो ज्या ठिकाणी सरकार वस्तू आणि सेवा यांची उत्पादन वितरण नियंत्रण करत असते काळाबाजार विकसनशील देशांमध्ये देखील होत असतो वस्तू आणि सेवांची कमी होत असता ,त्यावेळी काळाबाजारमार्फत त्या पूर्ण केल्या जातात तर विकसित अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये देखील काळा बाजार होत असतो जेव्हा सेवा किंवा वस्तूंच्या विक्री किमतीवर नियंत्रण ठेवले जाते व त्यावेळी वस्तूची मागणी जास्त असल्यास त्यावेळी अंशतः काळाबाजार होत असतो.

 

2. आर्थिक बाजार
आर्थिक बाजार म्हणजे फायनान्शिअल मार्केट होय यामध्ये भांडवल माहिती आणि तरलता ही व्यवसायांसाठी भौतिक किंवा आभासी या दोन बाजू असू शकतात मार्केटमध्ये स्टॉक मार्केट किंवा एक्सचेंज जसे की न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज NASDAQ, LSE यांचा समावेश होतो आणि इतर वित्तीय बाजारांमध्ये बॉण्ड मार्केट आणि परकीय चलन या बाजारांचा समावेश होत असतो जिथे लोक चलनाचा व्यापार करत असतात.

 

3. लिलाव बाजार
लिलाव बाजार हे एक असे ठिकाण आहे त्यामध्ये उत्पादनाच्या खरेदी किंवा विक्रीसाठी अनेक लोक हे एकत्रित जमलेले असतात व यामध्ये खरेदी करणारी हे किमतीसाठी बोली लावत असतात व या किमतींमध्ये अनेक खरेदीदार हे स्पर्धात्मक बोली लावत असतात म्हणजेच एकमेकांच्या किमतींमध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी असे स्पर्धा करत असतात तर विक्रीसाठी ठेवलेल्या सर्व वस्तूंची सर्वाधिक बोली जो व्यक्ती लावत असतो त्याच्याच कडे वस्तू जात असते.

 

शेअर मार्केट कसे काम करते (How to work share market)

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार दोन प्रकारे नफा मिळवू शकतो अल्पकालीन आणि दीर्घकालीन अल्पकालीन याला मार्केटच्या भाषेत शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म असे म्हणतात तर दीर्घकालीन गुंतवणुकीला( लॉंग टर्म )इक्विटी इन्व्हेस्टमेंट म्हणतात आणि (शॉर्ट टर्म )अल्पकालीन गुंतवणुकीला डेब्ट डेब्टइन्व्हेस्टमेंट असे म्हणतात.भारतातील स्टॉक मार्केट ही एक फायनान्शियल मार्केट आहेत त्यामध्ये इक्विटी बोर्ड यांची मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून किमतींमध्ये खरेदी विक्रीच्या अदलीबलीवर अनेक सिक्युरिटी असतात.ह्या सिक्युरिटीज सेबी इन इंडिया स्टॉक एक्सचेंजच्या नियमांचे अवलोकन करते भारतात दोन प्रकारचे प्रमुख स्टॉक मार्केट आहेत त्यामध्ये NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे दोन भारताचे प्रमुख स्टॉक मार्केट आहेत शेअर मार्केट हा संघ आणि केंद्रित फोरम आहे जो गुंतवणूकदारांना आणि कंपनींना एकत्रित करतो शेअर्स विक्री आणि खरेदी यांच्याद्वारे व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी पैसे जमवणे हे शेअर मार्केटचे प्रथम उद्दिष्टे आहे.

 

NSE म्हणजे काय? (What is NSEin Marathi)

 भारतातील सगळ्यात जास्त चालणारे मार्केट म्हणजे स्टॉक एक्सचेंज मार्केट नॅशनल स्टॉक एक्सचेंज होय एनएसईची स्थापना 1992 मध्ये मुंबई येथे झाली NSE ने भारतामध्ये सर्वात पहिले इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज पद्धत मार्केटमध्ये आणली इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज पद्धतीमुळे जो व्यवहार कागदावर व्हायचा तो इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पूर्ण होऊ लागला आणि 1993 पर्यंत एनएसईला स्टॉक एक्सचेंज कंपनी म्हणून मान्यता मिळाली आणि सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत कर भरणारी कंपनी म्हणून एनएसई समाविष्ट करण्यात आले आणि नंतर 1995 मध्ये एन एस डी एल ची स्थापना केली व गुंतवणूक करणाऱ्यांना एक इलेक्ट्रॉनिक पद्धत शेअर्स ट्रान्सफर करण्यासाठी उपलब्ध करून दिली 1996 मध्ये एनएसई ने पन्नास स्टॉप चा निफ्टी फिफ्टी इंडेक्स पूर्ण केला तो भारतीय भांडवली बाजारातील बॅरोमीटर म्हणून ओळखला जातो एनएससी नॅशनल स्टॉक एक्सचेंज हा 11 नंबरचा सर्वात मोठा स्टॉप एक्सचेंज मार्केट म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि 2017 पर्यंत त्याचे भांडवल बाजार 1.41 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स पर्यंत गेले.

 

BSE म्हणजे काय? (What Is BSE In Marathi)

1875 मध्ये द नेटिव्ह शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर असोसिएशनची स्थापना करण्यात आली .जे सध्याच्या काळात बीएसई म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणून ओळखले जाते भारतातील स्टॉक एक्सचेंज 1956 कायद्यांतर्गत प्रमुख स्टॉक एक्सचेंज म्हणून मान्यता देण्यात आली .1985 मध्ये सेन्सेक्स हा भारतातील 30 एक्सचेंज ट्रेनिंग कंपन्यांचा पहिला इक्विटी इंडेक्स म्हणून ओळखला गेला .1995 मध्ये बीएसई ऑनलाईन प्रिंटिंग ची बी ओ एल टी म्हणून स्थापना झाली तेव्हा एक दिवसात आठ मिलियन रुपये एवढी उलाढाल व्हायची त्यावेळी बीएसई या आशियाचा पहिला स्टॉक एक्सचेंज बनला जुलै 2017 पर्यंत बी एस इ भांडवल बाजार दोन ट्रिलियन डॉलर पेक्षा अधिक वाढला आणि सध्याच्या काळात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही जगातली 10 नंबरची सर्वात मोठी एक्सचेंज मार्केट आहे.

 

NSE आणि BSE यांच्यातील फरक (What is different between NSE and BSE)

NSE हे सर्वात मोठी व राष्ट्रीय पातळीवरची स्टॉक एक्सचेंज मार्केट म्हणून ओळखले जाते तर BSE हे सर्वात कमी स्टॉक एक्सचेंज मार्केट म्हणून ओळखले जाते. NSE हे जगातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंज कंपनीमध्ये 11 नंबरच्या स्टॉक एक्सचेंज मार्केट मधील येत आहे तर BSE 10 स्थानावर आहे NSE ने 1992 मध्ये इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज पद्धत मार्केटमध्ये उपलब्ध केले.तर BSE ने 1995 मध्ये b o l t ही पद्धत मार्केटमध्ये सुरू केली NSE चा बाजार भांडवल 1.65 ट्रिलियन पेक्षा जास्त किमतीपर्यंत गेला आहे तर BSEचा बाजार भांडवल 1.7 एवढा आहे. NSE हे भारतात सर्व शहरांमध्ये सेवा पुरवते तर BSEहे केवळ 400 शहरांमध्ये सेवापूर्वीच असते NSE साठी निफ्टी मानक निर्देशांक आहेत तर BSE साठी सेन्सेक्स चा वापर केला जातो NSE मध्ये 17000 पेक्षा अधिक कंपन्या रजिस्टर आहेत तर BSE 5500कंपन्या आहेत या दोन्ही स्टॉक एक्सचेंज कंपनी भारतातील शेअर बाजाराच्या दोन बाजू आहेत.

 

ट्रेडिंग म्हणजे काय (what is trading)

ट्रेडिंग म्हणजे शेअर मार्केट मधील कमी किमतीमध्ये खरेदी केलेले शेअर्स काही काळानंतर तेच कमी किमतीमध्ये घेतलेले शेअर जास्त किमतीत विकणे आणि त्यामधून झालेला नफा म्हणजे ट्रेडिंग होय शेअर मार्केट मधील शेअर खरेदी केल्यानंतर तो शेअर दिवस होल्ड करतात तो वेळ ट्रेडिंगचा प्रकार ठरवते आणि तोच वेळ गुंतवणूक दुप्पट करण्यास मदत करते

ट्रेडिंग चे प्रकार पुढील प्रमाणे (Types of Trading)

1. इंट्राडे ट्रेडिंग (Intraday Trading)
इंट्राडे ट्रेडिंग यामध्ये खरेदी केलेला शेअर त्या दिवशी शेअर मार्केटचा ट्रेंडिंग वेळ पूर्ण होण्याआधीच म्हणजेच मार्केटच्या दुपारच्या वेळेच्या आधीच शेअर विकून त्यापासून नफा हा मिळू शकतो इंट्राडे ट्रेडिंग मध्ये मोठ मोठी ट्रेडर्स हे सहभागी होत असतात हे ट्रेडर्स त्यांच्या जवळ असलेल्या भांडवलानुसार शेअर्सची किंमत जास्तीत जास्त किंवा कमीत कमी करत असतात त्यामुळे साधारण गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही इंट्राडे ट्रेडिंग नुकसानदायक ठरू शकते.

 

2. स्विंग ट्रेडिंग (Swing Trading)
या स्विंग ट्रेडिंग प्रकारांमध्ये खरेदी केलेला शेर काही दिवसांसाठी किंवा आठवड्यांसाठी होल्ड करतात आणि त्यानंतर चांगला नफा मिळाल्यानंतर होल्ड केलेला शेअर विकला जातो या स्विंग ट्रेडिंग प्रकारामध्ये शेअरच्या किमतीतील चढ उतार कसा चालू आहे हे या ट्रेनिंग प्रकारामध्ये याचा अभ्यास व निरीक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे त्यावरूनच शेअर कधी विकावा आणि त्यामधून कसा नफा मिळवावा याबद्दल अंदाज लावता येतो.

 

3. स्काल्पर ट्रेडिंग
या ट्रेडिंगमध्ये शेअर खरेदी केल्यानंतर तो शेअर काही मिनिटांमध्येच विकला जातो यासाठी फक्त काही मिनिटांचा अवधी असतो आणि नफा मिळाला की तो शेअर विकला जातो या ट्रेनिंग मध्ये ट्रेडरची रक्कम खूप जास्त असते या ट्रेडिंग प्रकारांमध्ये मोठमोठ्या ट्रेडर्स चा समावेश असतो जे ट्रेनिंग सॉफ्टवेअरचा उपयोग करून जास्त नफा कमवात असतात यामध्ये सर्वसाधारण गुंतवणूक करणाऱ्यांनी यामध्ये गुंतवणूक करणे त्यांना महाग पडू शकते

 

4. पोझिशनल ट्रेडिंग (posishaning trading)
पोजिशनल ट्रेडिंग मध्ये खरेदी केलेला शेर काही दिवसात ते काही महिन्यापर्यंत किंवा वर्षाच्या आत विकला गेला पाहिजे ओरिजनल ट्रेडिंग म्हणजे योग्य वेळ पाहून शेअर बद्दल पोझिशन घेणे आणि त्या योग्य वेळी महिन्याच्या आत किंवा वर्षाच्या आत शेर विकून त्यामधून नफा मिळवणे होय पोझिशनल ट्रेडिंग मध्ये साधारण गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात पण त्याला शेअरच्या कंपनी बद्दल आणि त्यांच्या उद्योग बद्दल अभ्यास करणे व त्याचे निरीक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे.

 

5. लॉंग टर्म ट्रेडिंग (long term trading)
लॉन्ग टर्म ट्रेडिंग म्हणजे शेअर खरेदी केल्यानंतर तो एक वर्षापेक्षा अधिक आणि जवळजवळ चार ते पाच वर्षासाठी होल्ड करू शकतो आणि त्या शेअरमधून आणि कंपनीच्या वाढत्या प्रक्रिये माध्यमातून पूर्ण नफा मिळवणे होय लॉन्ग टर्म ट्रेडिंग मुळे पावर ऑफ कंपाउंड चा योग्य अर्थ समजतो यामध्ये कंपनीचा दिविंडंट कंपनीने जर का जाहीर केले तर बोनस शेअर आणि कंपनीच्या शेअरच्या किमतींमध्ये झालेली काही पटीची वाढ अशा प्रकारे तीन पट नफा मिळतो साधारण गुंतवणूकदार लॉन्ग टर्म ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करू शकतात पण या ट्रेंडिंग बद्दल चा पूर्णपणे अभ्यास करून गुंतवणूक करावी .

 

शेअर मार्केट कसे शिकायचे (How to learn Share Market)

शेअर मार्केट शिकण्यासाठी सध्याच्या काळात बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत जसे की युट्युब वर शेअर मार्केट क्लासेस किंवा शेअर मार्केट बद्दलची व्हिडिओज ही सोशल मीडियावर मिळत असतात किंवा शेअर मार्केटची काही पुस्तके असतात. या माध्यमातून शेअर मार्केट शिकता येऊ शकते.

 

शेअर मार्केट शिकत असताना कोणती काळजी घ्यावी

शेअर मार्केट शिकत असताना सुरुवातीला जास्त पैशांची गुंतवणूक करू नये.कमी पैशातही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो सुरुवातीला जास्त गुंतवणूक करू नये हळूहळू गुंतवणुकीबद्दल अनुभव वाढला की जास्त पैशांची गुंतवणूक ही करू शकतो.
शेअर मार्केट ट्रेनिंग चा विचार करणे व इतर गुंतवणूकदार शेअर्स विकण्यास इच्छित असलेल्या सहभागासाठी खरेदीदार सतत बोली लावत असतात त्यामुळे विक्रेत्यांना त्यापासून सुटका करून घेण्यासाठी गुंतवणूकदार लवकर चेंज खरेदी करतील यामुळे ते किंमत जास्त वाढू शकतात या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
शेअर मार्केट शिकत असताना तुम्ही ज्या कंपनीचे शेअर घेत आहात त्या कंपनीचे इनकम काय आहे व त्या कंपनीच्या बॅकग्राऊंड काय आहे तुम्ही ज्या कंपनीमध्ये इमेज करू इच्छिता त्या कंपन्या वेळेनुसार त्यांची कामे कशी सुधारते व हा स्टॉक सध्याच्या काळात किती स्वस्त व किती महाग आहे याची पूर्णपणे चौकशी करून त्या कंपनीची शेअर्स विकत घ्या किंवा इन्व्हेस्ट करा.

 

शेअर मार्केट संबंधित काही शब्द (Some Words Related to Share Market)

1. शेअर्स किंवा स्टॉक (Share OR Stock)
शेज किंवा स्टॉक म्हणजे गुंतवणूकदारांनी एखाद्या कंपनीचा शेअर विकत घेतला तर त्या गुंतवणूकदारांची कंपनीमध्येएक भागाची हिस्सेदारी होत होते यालाच शेअर असे म्हणतात शेअरची किंमत नेहमी कमी किंवा जास्त होत असते तर स्टॉक म्हणजेच गुंतवणूक दाराकडे असलेल्या शेअरच्या कलेक्शनला स्टॉक असे म्हणतात.

 

2. शेअर होल्डर (Share Holder)
जेव्हा गुंतवणूक करणारा एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करतो तेव्हा त्या कंपनीमध्येगुंतवणूक करणाऱ्याची काही टक्क्यांची भागीदारी होत असते यालाच शेअर होल्डर असे म्हणतात.

 

3. बाईंग (Buying)
बाई म्हणजे एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणे किंवा त्या कंपनीचा भागीदार होणे म्हणजेच बाईंग होय

 

4. पोर्टफोलिओ (Portfolio)
गुंतवणूकदार त्याच्या खरेदी केलेल्या सर्व शेअरचा एक कलेक्शन तयार करतो त्याला पोर्टफोलिओ असे म्हणतात यामध्ये गुंतवणूकदाराला त्यांनी कोणत्या कंपनीचे शेअर घेतले हे करते आणि ते किती आहेत हे पोर्टफोलिओ मार्फत त्याला कळते आणि त्या गुंतवणुकीतील नफा आणि तोटा या दोघांचे बजेट करण्यासाठी गुंतवणूकदार एक चांगला पोर्टफोलिओ तयार करतो.

 

5. आय पी ओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग)
एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्केटमध्ये प्रथमच प्रवेश करते आणि गुंतवणूकदारांना शेअर पब्लिकली वापर करते याला आयपीओ म्हणतात. (Initial Public Offering)

 

6. निफ्टी फिफ्टी (Nifty Fifty)
हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज सूचीबद्ध करण्यात आलेले मुख्य 50 शेर चा निर्देशक म्हणून निफ्टी-फिफ्टी ओळखले जाते.
7. डिमॅट अकाउंट (Demat Account)
डिमॅट अकाउंट ट्रेडिंग साठी म्हणजे शेअरची खरेदी आणि विक्री करण्यासाठी गुंतवणूकदार हे डिमॅट अकाउंट वापरतात यामध्ये गुंतवणूकदाराची शेअर्स असतात.

 

8. सेबी (SEBI)
सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे सेबी एक शेअर बाजारावर लक्ष ठेवणारी एक संस्था आहे

 

9. ग्रोथ स्टॉक (Growth Stock)
ग्रुप स्टॉक हे असे स्टॉक असतात ज्या स्टॉक ची किंमत इतर स्टॉकच्या तुलनेत जास्तीत जास्त वेगाने वाढत असते.

 

10. व्हॅल्यू स्टॉक (Value Stock)
व्हॅल्यू स्टॉक हा असा प्रकार आहे की याचा मूलभूत गोष्टीच्या तुलनेत फार कमीत कमी वापर होत असतो.

 

11. फ्युचर ट्रेडिंग (future Trading)
शेअरची खरेदी आणि विक्रीचा व्यवहार हा रिलेटेड टाईम मध्ये होत असतो तर फ्युचर ट्रेडिंग हे भविष्यकाळात खरेदी किंवा विक्री करण्याचे कॉन्टॅक्ट असतात.

 

12. ओपन इंटरेस्ट (Open Interest)
ओपन इंटरेस्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे दिवसभराच्या शेवटी मार्केट मधील हिस्सेदारांकडून जमा करण्यात आलेले एकूण करारांची संख्या असते.

 

13. प्रेफरन्स शेअर (Prefernce Share)
काही खास गुंतवणूकदारांना कंपनीकडून जेर शेअर्स दिले गेले असतात त्याच प्रेफरन्स शेअर्स असे म्हणतात तर प्रेफरन्स ज्यांच्याकडे असतात त्या गुंतवणूकदारांना प्रेफर शेअर होल्डर म्हटले जाते.

 

14. इक्विटी शेअर्स (Equity Share)
हे सामान्य शेअर असतात आणि यात प्रत्येक गुंतवणूकदारांची काही टक्क्यांची मालकी असते.

 

15. बॉण्ड (Bond)
बोंड ही एक कर्जाची श्रेणी मानली जातेयामध्ये गुंतवणूकदार एखाद्या व्यक्तीला कर्ज देत असतो जे कर्ज निश्चित कालावधीसाठी निश्चित किंवा अनिश्चित व्याजदर मध्ये असते बॉण्ड मधून एखादा घटकासाठी निधी जमा करता येतो व आर्थिक गरजा पूर्ण करता येतात.

 

16. दर्शनी किंमत 
दर्शनी किंमत म्हणजे एखाद्या कंपनीच्या स्टॉक शेअरची दाखवली जाणारी प्रारंभिक किंमत तसेच त्याची प्रारंभिक मूल्य असतात.

 

17. डाऊन एवरेज
गुंतवणूकदार एखादा स्टॉक जास्त किमतीत खरेदी करतो आणि त्या स्टॉक ची किंमत वाढण्या ऐवजी कमी होऊ लागते यामुळे स्टॉक ची किंमत कमी झाल्यावर पुन्हा स्टॉक कमी किमतीत विक्री केला जातो. त्याचे एव्हरेज स्टॉक किंमत कमी होत असते यालाच एव्हरेजिंग डाऊन असे म्हणतात.

 

18. होलटीलिटी
शेअर बाजारात शेर ची किंमत नेहमी कमी जास्त होत असते म्हणजे त्यात एक प्रकारचा चढ-उतार क्रम तयार होत असतो यालाच होलटीलिटी असे म्हणतात.

 

19. लिमिट ऑर्डर
हा एक ऑर्डरचा प्रकार आहे जो खरेदी किंवा विक्री करण्यासाठी ठेवलेल्या किंमतीसाठी वापरला जातो

 

20. लॉंग टर्म ट्रेडिंग (Long Term Trading)
गुंतवणूकदार सहा महिने किंवा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करत असतो त्याला लॉंग टर्म ट्रेडिंग असे म्हणतात.

 

सेबी म्हणजे काय (What is SEBI in Marathi)

सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया होय. 12 एप्रिल 1988 मध्ये भारत सरकारच्या ठरावाद्वारे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना गैरवैधानिक संस्था म्हणून स्थापना करण्यात आली . सेबीचे मुख्यालय मुंबई येथे आहे तर काही ठिकाणी सेबीची प्रादेशिक कार्यालय आहेत.कोलकत्ता, चेन्नई ,अहमदाबाद ,आणि दिल्ली येथे सेबीचे प्रादेशिक कार्यालय आहे. सेबी हे शेअर मार्केट वर लक्ष किंवा देखरेख करण्यासाठी नेमलेली एक संस्था आहे सेबी हे गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी रक्षण करते . सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देते हेच सेबीची मुख्य उद्दिष्टे आहे. सेबी हे मार्केट मधील पारदर्शकता व सुनिश्चिती करत असते यामुळे गुंतवणूकदारांची फार्जी कामांपासून रक्षण करते.
सेवेचे प्रमुख पाच कार्य

 

सिक्युरिटीज मार्केट चे नियमन

सेबी सिक्युरिटी मार्केट साठी नियम व अटी तयार करते आणि सर्व सहभागी व मध्यस्थ आणि व नियमांचे पालन केले जाईल याची खात्री ठेवते.

 

गुंतवणूकदारांच्या फायद्याचे रक्षण करणे

सीबी ही निश्चित करते की हिंदू करणाऱ्यांना फसवणुकीच्या गोष्टींपासून इन साईड ट्रेडिंग पासून रक्षण करते ज्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांची शिक्षण व जागरूकता निर्माण होण्यास मदत होते.

 

सिक्युरिटीज मार्केटच्या विकासात चालना देणे

सीबी हे नवीन उत्पादने बाजारात सादर करून बाजारातील पायाभूत सुविधा मध्ये बदल करून व अनेक स्पर्धांना प्रोत्साहन देऊन सिक्युरिटी मार्केटच्या वाढीस आणि विकासात चालना देण्याचे काम सेबी करत असते.

 

मध्यस्थांचे नियमन

स्टॉक ब्रोकर, व्यापारी बँकर्स, म्युचल फंड यांसारख्या म्हणतेस त्यांचे नियमन व देखरेख करते.

 

फर्जी आणि अन्यायकारक ट्रेडिंग पद्धती वर प्रतिबंध करणे.

सेबी हे सिक्युरिटीज मार्केट मधील फर्जी आणि अन्यायकारक व्यापाऱ्यांच्या पद्धती विरुद्ध चौकशी करते आणि योग्य ती कारवाई सेबी करत असते

 

शेअर मार्केट शिकण्यासाठी काही पुस्तकांची नावे (Best Book Learn Share Market)

1. शेअर बाजार (शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्याची 41 सूत्रे) लेखक महेश चंद्र कौशिक
2. शेअर बाजारातून पैसे कसे कमवावे लेखक महेश चंद्र कौशिक
3. इंट्राडे ट्रेडिंग लेखक इन्द्रजिथ शांत राज
4. वॉरन बफे यांचे गुंतवणूक मंत्र
लेखक प्रदीप ठाकूर
 5. द इंटेलिजंट इन्वेस्टर
लेखक बेजामिन ग्रॅहॅम

 

FAQ: Share Market Information in Marathi Share Market Mahiti In Marathi

1. शेअर मार्केट कसे चालवायचे?
उत्तर. शेअर मार्केट चालवण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट अकाउंट ओपन करावे लागते
2. स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय?
उत्तर.स्टॉक एक्सचेंज म्हणजे शेअर्समधील होणाऱ्या व्यापाराला पोहोचणार देते आणि भांडवली बाजाराचा एक आवश्यक आहे.
3. स्टॉक मार्केट ची दोन प्रमुख प्रकार कोणते?
उत्तर.NSE आणि BSE हे दोन प्रकार आहेत.
4. NSE म्हणजे काय?
उत्तर. नॅशनल स्टॉक एक्सचेंज
5. BSE म्हणजे काय?
उत्तर. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज
6. शेअर मार्केट मधील दोन प्रमुख शहर बाजार कोणते आहेत?
उत्तर. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज NYSE आणि NASDAQ स्टॉक एक्सचेंज या दोन प्रमुख टीव्हीएस वित्तीय सिक्युरिटीज मार्केट आहेत.
7. शेअर मार्केटमध्ये कोणत्या संज्ञा वापरल्या जातात?
उत्तर. बियर मार्केट बुल मार्केट डीवींदन आस्क बीट आणि ब्लू चिप स्टॉक या वापर केला जातो.
8. भारतात किती स्टॉक एक्सचेंज आहेत?
उत्तर. भारतात एकूण 23 स्टॉक एक्सचेंज आहेत.
9. शेअर मार्केट म्हणजे काय?
उत्तर. हे एक ऑनलाईन मार्केट आहे जिथे व्यक्ती स्वतः उपस्थित नसतो परंतु खरेदी आणि विक्री होत असते.
10. शेअर्सची किती प्रकार आहेत?
उत्तर. शेअरचे दोन प्रकार आहेत इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर डीव्हीआर शेर,
11. सेबीची स्थापना केव्हा झाली?
उत्तर. 12 एप्रिल 1998 मध्ये.
12. सेबी म्हणजे काय?
उत्तर. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया
13. BSE ची स्थापना केव्हा झाली?
उत्तर 1875 मध्ये झाली.
14. NSE ची स्थापना कधी झाली?
उत्तर.1992 मध्ये झाली.
15. ट्रेनिंग चे किती प्रकार आहेत?
उत्तर . इंट्राडे ट्रेडिंग, स्कल्पर ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, पोजिशनल ट्रेडिंग इत्यादी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top