Lokmanya Tilak Biography In Marathi Lokmany Tilak Information In marathi

लोकमान्य टिळक जीवन चरित्र संपूर्ण माहिती | Lokmanya Tilak Biography In Marathi Lokmany Tilak Information In Marathi

Lokmanya Tilak Biography In Marathi Lokmany Tilak Information In marathi – स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.,आणि तो मी मिळवणारच ! अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक जहाल मतवादी क्रांतिकारी होते. भारतीय स्वातंत्र चळवळीमध्ये पहिले नेते, व भारतीय असंतोषाचे जनक व” लोकमान्य”अशी पदवी देण्यात आली होती. या लेखाद्वारे लोकमान्य टिळक यांची जीवन चरित्र बद्दल माहिती घेणार आहोत.यामध्ये त्यांचे पारिवारिक जीवन , त्यांचे शिक्षण ,सामाजिक जीवन, राजकीय जीवन, व लोकमान्य टिळक यांची कार्य याबद्दल माहिती घेणार आहोत. (lokmanya bal gangadhar tilak jayanti, mahiti,punyatithi, education, history, biography,, books, facts, achievements, legacy,death, life, carrer, school all information in marathi)

 

 

लोकमान्य टिळक थोडक्यात माहिती (Lokmanya Tilak Mahiti In Marathi)

जन्म 23 जुलै इसवी सन 1856
जन्म ठिकाण
चिखलीगाव ता. दापोली जि . रत्नागिरी महाराष्ट्र
नाव बाळ (केशव ) गंगाधर टिळक
शिक्षण 1877 मध्ये बी. ए. (गणित) पुणे डेक्कन कॉलेज, 1879 मध्ये एल एल बी
वृत्तपत्रलेखन केसरी, मराठा
उपाधी लोकमान्य
वडिलांचे नाव
गंगाधर रामचंद्र टिळक
आईचे नाव पार्वती बाई टिळक
पत्नीचे नाव सत्यभामाबाई
मुलांची नाव रमाबाई वैद्य, पार्वती बाई केळकर, विश्वनाथ रामभाऊ, श्रीधर बळवंत टिळक , रमाबाई साने
मृत्यू 1 ऑगस्ट इ स 1920

 

लोकमान्य टिळक यांचे पारिवारिक जीवन (Family Life of Lokmanya Tilak)

लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै रत्नागिरी येथील चिखली गावामध्ये हिंदू धर्मातील चित्पावन ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर रामचंद्र टिळक त्यांचे वडील शाळेत शिक्षक या पदवीवर टिकून होते आणि लोकमान्य टिळक 16 सोळा वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यू होण्याच्या काही महिन्या पहिलेच 1871 मध्ये केशव 16 वर्षाचे होते तेव्हाच त्यांचे लग्न तापी बाई यांच्याशी झाले. तापी बाई यांचे नाव लग्नानंतर सत्यभामा बाई बदलून ठेवले.

 

लोकमान्य टिळक यांचे शिक्षण (Education of Lokmanya Tilak)

लोकमान्य टिळक यांनी लग्नानंतर पुण्यातील डेक्कन कॉलेज येथून 1877 मध्ये गणित विषयात बी. ए. पदवी घेतली आणि एलएलबी चे शिक्षण करण्यासाठी त्यांनी एम ए चे शिक्षण मध्येच सोडले. व 1879 मध्ये गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मधून एलएलबी ची पदवी घेतली. एलएलबी ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी पुण्याच्या एका खाजगी शाळेमध्ये गणित विषय शिकवण्यास चालू केले व तेथील शिक्षकांमध्ये मतभेद झाल्यामुळे त्यांनी शिकवण्याचे बंद केले . व पत्रकारी सुरू केली सार्वजनिक कामांमध्ये टिळक क्रियाशील पणे सहभागी व्हायचे .

 

लोकमान्य टिळकांनी काढलेले वृत्तपत्र (Newspaper edited by Lokmanya Tilak)

लोकमान्य टिळक यांनी 1881 मध्ये लोकांना भारतातील लढाया आणि संकटांची ओळख करून देण्याकरिता व स्वराज्याचे विचार निर्माण करण्यासाठी आणि आपल्या हक्कांसाठी लढण्याची मनस्थिती तयार करण्यासाठी ‘केसरी ‘ आणि ‘मराठा ‘ही दोन वृत्तपत्रे काढली.

 

लोकमान्य टिळक यांची सामाजिक व शैक्षणिक कार्य (Social and Educational Work of Lokmanya Tilak)

1880मध्ये लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या महाविद्यालयातील मित्र विष्णुशास्त्री चिपळूणकर , गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नाम जोशी या मित्रांसह माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली. व भारतातील सर्व तरुणांकरता शिक्षण देण्याच्या पद्धतीत बदल करणे व हाच त्यांचा उद्देश होता . शाळेच्या स्थापनेत यशस्वी झाल्यामुळे टिळकांनी 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व एक वेगळी शिक्षण पद्धत तयार केली . ज्यामुळे भारतीय संस्कृतीवर भर टाकून भारतीय तरुणांना आपल्या राष्ट्रहिताचे विचार शिकवले जातील. आणि 1885 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीने महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यात आली. व लोकमान्य टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित व संस्कृत विषय शिकवण्यास सुरुवात केली. नंतर 1890 मध्ये लोकमान्य टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी सोडली.

 

लोकमान्य टिळक यांचे सामाजिक कार्य (Social Work of Lokmanya Tilak)

लोकमान्य टिळक यांनी अनेक सामाजिक सुधारणा केल्या आहेत. बालविवाह विरुद्ध आवाज ,जातिव्यवस्था व जाती भेदभाव दूर करणे विधवा पुनर्विवाह व महिलांच्या शिक्षण व विकासासाठी प्रयत्न केले. अशा अनेक सामाजिक सुधारणा केल्या.

 

सार्वजनिक उत्सवांची सुरुवात (Commencement of Public Festivities)

इसवी सन 1893 साली लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सव आणि महात्मा फुले यांनी शिवजयंती हे सार्वजनिक उत्सव साजरी करण्यास सुरुवात केली. गणेश उत्सव व शिवजयंती हे सार्वजनिक सण असून ब्रिटिश विरोधात सामान्य लोक उभे करण्यासाठी जनजागृती करणे हा उद्देश्य लोकमान्य टिळकांचा होता.

 

लोकमान्य टिळक यांची राजकीय कार्य (Political Work of Lokmanya Tilak)

लोकमान्य टिळक यांनी यांच्या विस्तृत अशा राजकीय कामांमध्ये ब्रिटिशांच्या राजवटी पासून मुक्त होण्यासाठी भारतीय स्वातंत्र्यासाठी व अधिकारासाठी लोकमान्य टिळकांनी संघर्ष केले. महात्मा गांधी यांच्या पहिले ते भारतातील प्रख्यात असे पहिले राजकीय नेते होते. लोकमान्य टिळक हे कट्टर राष्ट्रवादी पण सामाजिक परंपरा वादी म्हणून त्यांना ओळखले जात होते.

 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष (Indian National Congress Party)

1890 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये लोकमान्य टिळकांनी प्रवेश केला. स्वराज्याच्या संघर्ष करता काँग्रेसच्या उदारमतवादी विचारांना विरोध घातला. लोकमान्य टिळकांनी सांगितले की ब्रिटिशांच्या विरोधात साधी सोपी घटनात्मक चळवळ करणे सार्थकी ठरणार नाही. व काँग्रेसचे प्रमुख नेते गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विरोधात ते उभे राहिले. याच्यामुळे पक्षातील काही नेते व लोकमान्य टिळक यांच्यात विचार भिन्नतेमुळे मतभेद झाले . शेवटी1897 मध्ये टिळकांना संघातून बाहेर करण्यात आले . लॉर्ड कर्झनच्या बंगाल फाडणीनंतर स्वदेशी चळवळ आणि ब्रिटिश वस्तूंच्या वापरावर बहिष्कार करण्यासाठी संमती दिली. लोकमान्य टिळक व त्यांची सहाह्यकांचे विचार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्यान पेक्षा वेगळे होते. टिळकांच्या प्रयत्नांना त्यांचे सहकारी बंगालचे बिपिन चंद्रपाल व पंजाबचे लाल लजपत राय याचा पाठिंबा टिळकांना भेटला. व हे तिन्ही लाल बाल पाल म्हणून ओळखण्यात आले. त्यानंतर 1907 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दोन भागात विभागणी झाली.

 

लोकमान्य टिळकांचा तुरुंगवास (Imprisonment of Lokmanya Tilak)

लोकमान्य टिळकांना ब्रिटिश सरकारच्या जबरदस्तीचे व दाबाच्या वागणुकीला तीव्र विरोध केला आणि त्यांच्या वर्तमानपत्रांमध्ये ब्रिटिशांन विरुद्ध उत्तेजित असे लेख लिहिले. व त्या लेखांच्या प्रभावामुळे चाफेकर बंधूंनी 22 जून 1897 मध्ये कमिशनर रेंड औरो लेफ्टनंट आयस्टर याची हत्या केली. यामुळे लोकमान्य टिळकांवर हत्या व देशद्रोहाचा खटला लागू केला गेला व 6 वर्ष हद्दपार अशी शिक्षा देण्यात आली.
1908 ते 1914 या कालावधीत टिळकांना ब्रह्मदेशातील मंडले येथील तुरुंगात ठेवण्यात आले. टिळक तुरुंगात असतानाही त्यांचे लिखाण काम सुरूच होते. व तेथे गीता रहस्य हे पुस्तक लिहिले. इंग्रजांनी त्यांच्या वर्तमानपत्रांची प्रकाशने बंद करण्याची प्रयत्न केले परंतु लोकमान्य टिळकांची सामान्य जनतेत लोकप्रियता व आपुलकी खूपच वाढली होती आणि स्वराज्य व स्वतंत्र देशाची इच्छा त्यांच्या मनात जागृत झाल्या होत्या. यामुळे इंग्रजांना लोकमान्य टिळकांसमोर झुकावे लागले.

 

लोकमान्य टिळकांचा मृत्यू (Death of Lokmanya Tilak)

जालियनवाला बाग हत्याकांड नंतर लोकमान्य टिळक हे अगदी अस्वस्थ व निराश झाले होते. आणि या कारणामुळे त्यांची शारीरिक परिस्थिती खूप खराब झाली. व त्यांनी सर्व भारतीयांना सांगितले की काहीही झाले तरी चळवळ बंद करू नका. व या दरम्यान लोकमान्य टिळक यांनी 1ऑगस्ट 1920 रोजी शेवट श्वास घेतला व यांचे दुःखद निधन झाले.

 

FAQ: Lokmanya Tilak Biography In Marathi Lokmany Tilak Information In marathi

1.लोकमान्य टिळक यांचा जन्म कधी झाला? (When was Lokmanya Tilak born?)
उत्तर. 23 जुलै 1856 मध्ये झाला.
2. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव? (Full Name Of Lokmanya Tilak?)
उत्तर. बाळ (केशव )गंगाधर टिळक
3. लोकमान्य टिळक यांना ब्रिटिश अधिकारी काय म्हणत? (What did the British officers call Lokmanya Tilak?)
उत्तर. “भारतीय असंतोषाचे जनक “
4. लोकमान्य टिळकांना किती वर्षाचा तुरुंगवास झाला? (Lokmanya Tilak was jailed for how many years?)
उत्तर. लोकमान्य टिळक यांना 6 वर्ष व हद्दपारची शिक्षा झाली.
5. लोकमान्य टिळकांची तुरुंगातून कधी सुटका झाली? (When was Lokmanya Tilak released from jail?)
उत्तर. 1914 मध्ये झाली.
6. टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? (Who gave the title of Lokmanya to Tilak?)
उत्तर. जेव्हा टिळक हे ब्रिटिश राजवटी विरुद्ध भारतात लढत होते तेव्हा महाराष्ट्रातील जनतेने “लोकमान्य ” ही पदवी दिली.
7. लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव काय होते? (What was the name of Lokmanya Tilak’s father?)
उत्तर. गंगाधर रामचंद्र टिळक
8.लोकमान्य टिळकांच्या आईचे नाव काय होते? (What was the name of Lokmanya Tilak’s mother?)
उत्तर. पार्वती बाई गंगाधर टिळक.
9 लोकमान्य टिळक यांचे वयाच्या कोणत्या वर्षात लग्न झाले? (In which year did Lokmanya Tilak get married?)
उत्तर. वयाच्या 16 वर्षी लग्न झाले.
10. लोकमान्य टिळक यांनी पदवी शिक्षण कोणत्या ठिकाणी घेतले? (Where did Lokmanya Tilak do his graduation?)
उत्तर. पुण्यातील डेक्कन कॉलेज येथे बी ए ची पदवी घेतली.
11. न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना कोणत्या साली केली? (New English School was established in which year?)
उत्तर 1880 मध्ये लोकमान्य टिळक ,विष्णु शास्त्री चिपळूणकर ,गोपाळ गणेश आगरकर महादेव बल्लाळ नाम जोशी यांनी मिळून केले.
12. लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सव कोणत्या साली सुरू केला? (Lokmanya Tilak started Ganesh Utsav in which year?)
उत्तर.1881 मध्ये सुरू केला.
13. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कधी झाली? (When was Fergusson College established?)
उत्तर. पुणे डेक्कन सोसायटीने 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली.
14.लोकमान्य टिळक यांनी काँग्रेस पक्षात कधी प्रवेश घेतला? (When did Lokmanya Tilak join the Congress Party?)
उत्तर.1890 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
15. लोकमान्य टिळक यांचा मृत्यू कधी झाला? (When did Lokmanya Tilak die?)
उत्तर. 1ऑगस्ट 1920 रोजी झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top