वट पौर्णिमा कधी आहे 2024? तारीख, मुहूर्त वेळ, पूजा विधी, इतिहास, महिती जाणून घ्या | Vat Purnima 2024 Muhurt Time, Sahitya List In Marathi

वट पौर्णिमा कधी आहे 2024? तारीख, मुहूर्त वेळ, पूजा विधी, इतिहास, महिती जाणून घ्या | Vat Purnima 2024 Muhurt Time, Sahitya List In Marathi

Vat Purnima 2024 Muhurt Time, Sahitya List In Marathi – नमस्कार मित्रांनो, आज आपण तुमच्या साठी वटपौर्णिमेच्या उपवास बद्दल संपूर्ण माहिती घेऊन आले आहोत. वटपौर्णिमा म्हणजे काय? पतीच्या दीर्घायुष्य साठी योग्य वट सावित्रीची पूजा किव्वा, वटसावित्री चा उपवास सोप्या पद्धतीने कसे करावे? पूजेला लागणारे साहित्य कोणकोणते? आपण वटपौर्णिमा घरी पण साजरा करू शकतो का? वटपौर्णिमेच्या उपवासात खाल्ले जाणारे पदार्थ कोणते? इ. गोष्टी आपण या लेखात पाहूया. (Vat purnima, muhart, time, sahitya list, Puja vidhi, fruits, date time, purnima in june 2024, poornima, vat savitri 2024, purnamasi, vat savitri puja 2024)

 

वट पौर्णिमा 2024 थोडक्यात माहिती | Vat Purnima 2024

मराठी महिना ज्येष्ठ या महिन्यातील पहिल्या पौर्णिमेला वट पौर्णिमेचा सन साजरा केला जातो. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस हा वट पौर्णिमेचा दिवस म्हणून साजरा केला जातो. वट पौर्णिमेला काही भागात वटसावित्री या नावाने देखील ओळखतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्य तसेच निरोगी जीवनासाठी स्त्रिया वट पौर्णिमेचा उपास करतात, आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. 2024 वट पौर्णिमेचा दिवस कधी व कोणत्या महिन्यात आणि या दिवशीचा पौर्णिमा काळ किती आहे हे माहिती करून घ्या.

 

 

वट पौर्णिमेच्या उपसात महिलांची श्रद्धा | Vat Pornima Upavas Vrat Mahilanchi Shradhdha

देव काळात जेव्हा सत्यपाल चा मृत्यू झाला तेव्हा सती मातेने आपल्या नवऱ्या साठी वडाच्या झाडा खली बसून सत्यपाल पुनर्जीवित व्हावे म्हणून ब्रह्म,देव,विष्णू भगवान,शिव यांना सत्यपाल ला जीवन दान देण्यासाठी तपस्या (उपवास) केली होती. तिच्या तपस्येने प्रसन्न होऊन त्रिदेवांने त्याला जीवनदान दिले.म्हणून त्या काळपासून वडाच्या झाडाला प्राण वृक्ष म्हणून ओळखतात. व स्त्रिया या झाडाची पूजा वटपौर्णिमेच्या दिवशी करतात.

 

वट पौर्णिमा काळ | Vat Purnima Kal

यंदा जेष्ठा महिन्यातील पौर्णिमा 21 जून शुक्रवार रोजी आहे. त्यामुळे या दिवशी स्त्रिया वट पौर्णिमेच व्रत करतील. पौर्णिमा काल 21 जूनला सकाळी 7 वाजून 31 मिनिटांनी सुरू होईल आणि 22 जून ला संध्याकाळी 5 वाजून 37 मिनिटांनी संपेल.

 

वट पौर्णिमा पूजेचे शुभ मुहूर्त | Vat Purnima 2024 Shubh Muhurt Time

वट पौर्णिमा पूजन मुहूर्त 21 जून रोजी सकाळी 5 वाजून 24 मिनिटांनी ते सकाळी 10 वाजून 30 मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे.

 

पूजा साहित्य | Vat Purnima Puja Sahitya List In Marathi

वटपौर्णिमेच्या पूजेला लागणारे साहित्य हिरव्या बांगड्या, शेंदूर, एक गडसरी (काळी मनीची पोत), अत्तर, कपूर ,पंचामृत, पूजेचे वस्त्र ,विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गुढ खोबऱ्याचे नैवेद्य, पाच आंबे (वोटी भरण्यासाठी), दुर्वा, गहू, सती मातेचा फोटो किंवा त्या बदल्यात सुपारीही चालेल इ.

 

वट पौर्णिमा पूजा विधी | Vat Purnima Pujan Vidhi

प्रथम सौभाग्यवती स्त्रीने माझ्या नवऱ्याला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो असा संकल्प करावा. सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणतीही स्त्रीने आपल्या नवऱ्यासाठी पूर्ण श्रद्धेने हा उपवास करावा.

प्रथम, सुपारी चा गणपती म्हणून स्थापना करावी. त्या गणपतीला हळद-कुंकू अक्षता वाहून पूजा करावी. नंतर एका सुपारीचे सती माता म्हणून स्थापना करावी. (सती मातेचा फोटो राहिला तरी चालेल) व त्याला देखील हळद, कुंकू, काळी पोत, हिरवा बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे.

वडाचे मुळा जवळ’ अभिषेक पुरुष सुता सह ,पूजा व आरती करावी. वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य द्यावा. नंतर वडाच्या झाडाला तिहेरी सुत म्हणजेच दोरा गुंडाळून सात किंवा पाच प्रदक्षिणा घालावे. एवढे झाल्यावर पाच सुवासिनी ची आंबे व गव्हाणे ओटी भरावी.

 

वट पौर्णिमेचा व्रत करत असताना खाल्ले जाणारे पदार्थ | Vat Purnima Fal Fruits

बहुतेक उपासांमध्ये महिला साबुदाणे भगर शेंगदाण्याची बर्फी किंवा खोबऱ्याची बर्फी शिंगाड्याच्या पिठाचे थालीपीठ राजगिराचा शिरा इत्यादी पदार्थ खाऊन उपास करतात परंतु वटपौर्णिमेच्या उपवासात अशा प्रकारचे पदार्थ न खाता फळे खाऊ शकतो. तर फळांमध्ये आंबा, ओले नारळ, खजूर, केळी, पेरू, चिकू असे काही चार-पाच प्रकारांची फळ खाऊन आपण उपवास करू शकतो.

 

महिलांनी उपवास करत असताना आरोग्याची काळजी | Health care for women while fasting of vat purnima

काही महिला असा विचार करून निरंकट उपवास करतात. की आपण जर निरंकट उपास केला तर आपल्याला जास्तीत जास्त उपवासाचा लाभ होईल. परंतु असे केल्याने आपल्यांना ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. किंवा पोट दुखणे चक्कर येणे अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. स्वतःच्या आरोग्याला त्रास देऊन उपवास करणे हे देवावर संकट आणण्यासाठी होते. म्हणून उपाशी राहून उपास करू नये.

 

वट पौर्णिमा घरी साजरा करू शकतो का? | Can Vat Purnima be celebrated at home?

वट पौर्णिमेचा उपवास हा आपण आपल्या नवऱ्यासाठी त्यांच्या दीर्घायुष्य व निरोगी आरोग्यासाठी करत असतो. म्हणून हा उपवास जेवढ्या निर्मळ मनाने किंवा श्रद्धेने पूजा विधी ने संपन्न केला. तेवढेच उपवासाचे फळ आपल्या पतीला मिळत असते. ज्या हेतूने आपण उपास करत असतो त्यासाठी आपण पूजेची विधी पद्धत पालन आवश्यक आहे. म्हणून पूर्वीच्या काळापासून वट पौर्णिमेची पूजा ही वडाच्या झाडा जवळ केली जाते. किंवा या उपवासात वडाच्या झाडाला देव समान मानून झाडाची पूजा करून हा उपवास संपन्न केला जातो. म्हणूनच, तुम्हाला जर वट पौर्णिमेचा उपवास खऱ्या मनाने करायचा असेल तर जुन्या रूढी परंपरा नुसार वट पौर्णिमेचा उपवास घरी न करता वट वृक्षा जवळच केली पाहिजे.

टीप : (शहरातील महिलांना जास्त तर वटवृक्ष पूजेसाठी जवळपास आढळत नसतात म्हणून अशा ठिकाणी महिलांनी छोटेसे वटवृक्ष कुंडी मध्ये जर मिळत असेल तर आपल्या घरी आणून त्या छोट्या वटवृक्षाची पूजा करू शकतात).

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top