PM Surya Ghar Yojana Maharashtra – Pradhanmantri Surya Ghar Yojana Benefits, Eligibility, Required Documents, Portal, Website, Registration, Subsidy Amount, How to apply online all related information about PM Surya Ghar Yojna. Some people also known these scheme as solar panel yojana or free solar panel yojana and Pradhan mantri solar panel yojana.
PM Surya Ghar Free Vij Yojana Maharashtra
PM सूर्य घर मोफत वीज योजना, ही भारत सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या भारतीय नागरिकांना मोफत वीज (Free Electricity) दिली जाणार आहे. PM Surya Ghar Free Electricity Yojana आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी घोषित केली होती. तर या योजनेअंतर्गत कोण अर्ज करू शकता?. अर्ज करण्यासाठी कोण पात्र असेल. अर्ज कुठे व कसा करायचा. याची संपूर्ण माहिती येथे मिळणार आहे.
तर पीएम सूर्य घर योजनेचा फायदा देशातील पात्र नागरिकांना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या घरा वरती सोलर पॅनल बसवण्यासाठी सबसिडी दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिक आता त्यांच्या घरातूनच वीज निर्मिती करून स्वतः वापरू शकता आणि इतरांना सुद्धा विकू शकतात. त्यामुळे देशातील नागरिकांना खूप मोठा फायदा होणार आहे. या योजनेची सविस्तर माहिती खाली पाहूया.
PM Suryoday Yojana | पीएम सूर्योदय योजना
PM सूर्य घर योजना त्यालाच “पीएम सूर्योदय योजना” किंवा “पीएम सूर्यग्रहण योजना” असेही म्हटले जात. तर नेमकं ही योजना काय आहे तर हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
पीएम सूर्योदय योजना, या योजनेअंतर्गत देशातील पात्र असलेल्या नागरिकांना त्यांच्या 40% पर्यंत सबसिडी दिले जाणार आहेत. एक करोड कुटुंबीयांना याचा लाभ होणार आहे. यामुळे सरकारला लागणारा वार्षिक खर्च 75,000 कोटी एवढ्या पैशांची बचत होणार आहे. आणि नागरिकांना फायदा सुद्धा होणार आहे. तर या योजनेमुळे होणारा फायदा जाणून घेऊया.
PM सूर्य घर योजना फायदे (Benefits)
- पीएम सूर्य घर मोफत वीज योजना मुळे देशातील 1 कोटी कुटुंबीयांना याचा लाभ मिळणार आहेत.
- नागरिकांना त्याच्या घरा वरती सोलर पॅनल बसवण्यासाठी 40% पर्यंत सबसिडी देणार आहे.
- तसेच सोलर पॅनल बसवल्या नंतर त्या कुटुंबीयांना मोफत वीज मिळणार आहे.
- कोळशापासून आणि इतर साधनां पासून तयार होणारी वीज कमी लागेल आणि त्यामुळे प्रदूषण कमी होईल.
- वीज तयार करण्यासाठी सरकारला लागणारा खर्च कमी होईल.
- पात्र नागरिकांना विजेचा खंड न पडता विज वापरता येईल.
- लाभार्थ्यांना 300 युनिट पर्यंत वीज मोफत मिळेल व वर्षाला वीज बिलावर होणारा पंधरा हजार रुपये एवढा खर्च वाचेल.
Suitable Rooftop Solar Plant Capacity for Households
खाली तुम्हाला पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत, किती युनिट साठी किती kW चा Solar Plant ची आवश्यकता असेल आणि त्याला किती Subsidy मिळणार या बाबतची माहिती दिली आहे.
महिन्याला वापरली जाणारी वीज | सोलर प्लॅन शमता | सबसिडी |
0-150 | 1-2kW | 30,000/- ते 60,000/- |
150-300 | 2-3kW | 60,000/- ते 78,000/- |
>300 पेक्षा जास्त | 3kW पेक्षा जास्त | 78,0000/- |
PM Surya Ghar Yojana ची काही वैशिष्ट्ये व उद्दिष्टे
1) घरगुती वापरात येणाऱ्या विजेची बचत होईल.
2) 1 ते 3 किलो वॅट पर्यंत 40% टक्के अनुदान मिळणार आहे.
3) 3 किलो वॅट पेक्षा अधिक ते 10 किलो वॅट पर्यंत 20 टक्के अनुदान मिळणार आहे.
4) 1 कोटी भारतीय नागरिकांना याचा लाभ मिळेल.
कोण अर्ज करू शकतो (Eligibility Criteria)
1) उमेदवार भारताचा नागरिक असावा.
2) अर्जदारकडे स्वतःचे घर आणि त्यावर मोकळी जागा हवी.
3) अर्जदाराकडे वैध वीज जोडणी असावी.
4) अर्जदाराने याआधी कोणत्याही सोलर पॅनल योजनेचा किंवा यासारख्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
6) बँक खाते आधार कार्ड लिंक असावे.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents List)
पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खाली देण्यात आले आहेत. हे कागदपत्रे ऑनलाइन फॉर्म भरत असताना तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे.
1 | आधार कार्ड |
2 | बँक खाते पासबुक |
3 | पत्याचा पुरावा |
4 | उत्पन्न दाखला |
5 | वीज बिल |
6 | शिधापत्रिका |
7 | मोबाईल नंबर |
How to Apply PM Surya Ghar Yojana 2024 Online (अर्ज कसा करायचा)
पीएम सूर्य घर योजना साठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास. खाली दिलेल्या वेबसाईट व पद्धतीचा वापर करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने स्वतः अर्ज करू शकता.
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट – येथे क्लिक करा
1) PM सूर्य घर योजना अर्ज करण्यासाठी pmsuryaghar.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
2) येथे “Apply For Rooftop Solar” या पर्यायावर क्लिक करा.
3) येथे Consumer Account Details मध्ये Select State (राज्य निवडा), Select District (जिल्हा निवडा), Electricity Distribution Company निवडा, तुमचा विज बिल नंबर टाका, आणि Registration करून घ्या.
4) आता Consumer Number आणि Mobile Number वापरून login करा.
5) आता Online Application Form Fill करा.
6) तुमचा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याच्या Approval ची वाट पहावी लागेल. फॉर्म अप्रू झाल्यानंतर तुमच्या घरी सोलर पॅनल बसवले जातील.
7) सोलर पॅनल बसवल्यानंतर तुम्हाला Net Meter साठी Apply करावं लागेल.
8) Net Meter Installation झाल्यावर Discom कडून कमिशनिंग सर्टिफिकेट तुम्हाला दिले जाईल.
9) आता त्या कमिशन रिपोर्ट चा वापर करून पोर्टल वरती बँक डिटेल भरावी लागेल त्यानंतर पुढील 30 दिवसात तुमचे सबसिडी खात्यात जमा होईल.
How to Check Status PM Surya Ghar Yojana Online Form (अर्जाची स्थिती कशी चेक करायची)
1) तुम्ही भरलेल्या अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2) आता Apply For Rooftop Solar असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
3) येथे Login Here या पर्यावरण क्लिक करा.
4) तुमचा Registered Mobile नंबर टाका, तिथे दिलेला संकेतांक टाका, आणि Login करा.
5) आता तुम्ही भरलेला फॉर्म तुम्हाला पाहायला मिळेल.
6) येथे फॉर्मची कुठपर्यंत तपासणी झाले आहे त्याची स्थिती (Status) तुम्ही चेक करू शकता.
Solar Rooftop Calculator कसे वापरायचे
Solar Rooftop Calculator चा वापर करून तुम्हाला येणारा अंदाजित खर्च किती असू शकतो याची खातरजमा तुम्ही करून घेऊ शकता. Solar Rooftop Calculator मध्ये तुम्हाला काही माहिती विचारली जाते. ती भरल्यावर तुम्हाला लागणाऱ्या खर्चाची अंदाजीत रक्कम तुमच्यासमोर मांडले जाते. Solar Rooftop Calculator कसे वापरायचे ते पाहूया.
1) सोलर रूप टॉप कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी pmsuryaghar.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
2) वेबसाईटला बाजूला “Know More About Rooftop Solar” या पर्यायाखाली “Calculator” या बटणावर क्लिक करा.
3) येथे राज्य निवडा, तुमची कॅटेगिरी निवडा, महिन्याला येणारे बिल टाका,
4) बाजूला काही अतिरिक्त माहिती टाकावी लागेल, ती माहिती तुम्ही तुमच्या इच्छेनुसार टाकू शकता. किंवा Calculate बटनावर क्लिक करा.
5) तुम्हाला अंदाजित सर्व माहिती मिळून जाईल.
किंवा अजून चांगले परिणाम मिळवण्यासाठी बाजूला देण्यात आलेली अतिरिक्त माहिती भरा.
6) तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी किती जागा आहे ती माहिती टाका.
7) तुम्ही किती पैसे Invest करू शकता ते टाका, आणि किती KW ची तुम्हाला आवश्यकता आहे ते टाका, आणि तुमच्या घराचा लोड (Sanction Load) टाका. आणि Calculate बटनावर क्लिक करा.
8) आता आधीपेक्षाही चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील.
9) अशा पद्धतीने तुम्ही सोलर रूप टॉप कॅल्क्युलेटर वापरू शकता.
FAQ: PM Surya Ghar Yojana Maharashtra
Q. PM Surya Ghar Yojana कधी सुरू झाली?
Ans. या योजनेची घोषणा 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली होती. त्यानंतर योजनेची अंमलबजावणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 01 फेब्रुवारी 2024 रोजी केली त्यानंतर योजना सुरू झाली.
Q. PM Surya Ghar Yojana Official website link?
Ans https://pmsuryaghar.gov.in/
Q. How I can apply pm Surya Ghar Yojana online
Ans. तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन प द्धतीने स्वतः अर्ज करू शकता.