ZP Zilha Parishad Bharti Exam Syllabus and Books In Marathi – महाराष्ट्र (ZP) जिल्हा परिषद मार्फत मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. तरी या भरती प्रक्रियेत अनेक वेगवेगळ्या पदांची भरती होणार आहे . या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले जातील. या भरती परीक्षेसाठी पदानुसार लागणारा अभ्यासक्रम, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, आणि परीक्षेचे स्वरूप याबद्दलची माहिती. तसेच भरती परीक्षेत अभ्यासासाठी आवश्यक असणारी पुस्तकांची नावे व यादी याबद्दलची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून माहिती करून घेणार आहोत.
शैक्षणिक पात्रता (eduacation)
1) 4 थी पास
2) 10 वी
3) 12 वी पास.
4) ITI / डिप्लोमा
5) पदवीधर
3) इतर सर्व क्षेत्रातील शैक्षणिक पात्र असलेले विद्यार्थ्यांना या भरती साठी अर्ज करता येईल.
वयाची अट (Age Limit)
1) खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 40 वर्ष वय
2) मागासवर्गीयांसाठी 18 ते 45 वर्ष वय
3) तरी पदानुसार वयाची अट निश्चित केली जाऊ शकते.
परीक्षेचा आभ्यास करण्यासाठी पुस्तके ( ZP Zilha Parishad Bharti Books)
Buy | |
Buy | |
Buy | |
Buy | |
Buy |
परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern)
1) जिल्हा परिषद भरती परीक्षा ऑफलाइन /ऑनलाइन या दोन्ही पद्धती पैकी परिस्थितीनुसार घेतली जाऊ शकते .
2) तांत्रिक विषय इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांमध्ये असेल.
3) तांत्रिक संवर्ग पदाकरिता 60 प्रश्न मराठी ,इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता अंकगणित या विषयावर तर 40 प्रश्न तांत्रिक विषयाचे असतील.
4) तांत्रिक विषय नसलेल्या पदांसाठी 4 विषयांना प्रत्येकी 25 प्रश्न असतील त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता व अंकगणित यांचा समावेश असेल.
5) या भरती परीक्षेसाठी 2तास(120 मिनिटे) वेळ दिला जाईल.
6) या भरती परीक्षा नकारात्मक गुण (निगेटिव्ह मार्किंग) नसतील.
7) या भरती परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकांचे स्वरूप 10 वी 12 वी च्या व पदवी दर्जाची असेल.
8) या भरती परीक्षेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
जिल्हा परिषद भरती परीक्षा अभ्यासक्रम (Syllabus)
जिल्हा परिषद भरती परीक्षेसाठी एकूण पाच विषयांचा अभ्यास केला जातो त्यामध्ये मराठी सामान्य ज्ञान इंग्रजी बुद्धिमत्ता व अंकगणित आणि तांत्रिक या विषयांचा अभ्यास केला जातो. या विषयाबद्दल अभ्यासक्रम सविस्तरपणे खाली दिलेला आहे.
1) मराठी
वाक्यरचना –
वाक्याचे प्रकार व वाक्यातील त्रुटी
व्याकरण –
काळ व काळाचे प्रकार,
शब्दांच्या जाती, समास,
प्रयोग ,अलंकार
सर्वसाधारण शब्द संग्रह –
समानार्थी, विरुद्धार्थी शब्द,
शब्दसमूह एक शब्द
म्हणी व वाक्यप्रचार आणि
अर्थ व वाक्यात उपयोग
उताऱ्यावरील प्रश्न .
2) सामान्य ज्ञान
भारत व महाराष्ट्राचा भूगोल
आधुनिक भारताचा इतिहास
भारतीय अर्थव्यवस्था
महाराष्ट्र जिल्ह्यांचा भूगोल व इतिहास
महाराष्ट्रातील समाजसुधारक
राज्य प्रशासन, जिल्हा व ग्राम प्रशासन
यांची रचना संघटन व कार्य
कृषी आणि ग्रामीण विकास
भारत व शेजारील देशांच्या चालू घडामोडी
स्थानिक वैशिष्ट्ये व हवामानातील यांचा अभ्यास
3) इंग्रजी
Synonyms, antonyms
Sentence structure
Part of speech
Subject verb agreement
Tense
Direct and indirect speech
Active voice, passive voice
Comprehension of passage
Idioms and phrases
4) अंकगणित व बुद्धिमत्ता
अंकगणित आधारावर प्रश्न
सामान्य बुद्धी मापन व आकलन
तर्क क्षमता आधारावर प्रश्न
विषय व विषयानुसार प्रश्न व गुणांची विभागणी
जिल्हा परिषद भरती परीक्षा साठी 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातील या प्रश्न व गुणांची विषयानुसार विभागणी सविस्तर खालील प्रमाणे .
1) मराठी – 15 प्रश्न , 30 गुणांसाठी
2) सामान्य ज्ञान – 15 प्रश्न , 30 गुणांसाठी
3) इंग्रजी – 15 प्रश्न , 30 गुणांसाठी
4) अंकगणित व बुद्धिमत्ता – 15 प्रश्न, 30 गुणांसाठी
5) तांत्रिक विषय – 40 प्रश्न , 80 गुणांसाठी
एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातील.
FAQ. Jilha Parishad ZP Zilha Parishad Bharti Exam Syllabus and Books In Marathi
Q. जिल्हा परिषदेचे कोणती कामे असतात?
Ans. स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य, व्यावसायिक शाळा आणि औद्योगिक शाळा, व लघु पाटबंधारे, आणि ग्रामीण उद्योग अशी ग्रामपंचायतींच्या विकासाची कामे करते.
Q. जिल्हा परिषद भरती मध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असतो?
Ans. आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,कनिष्ठ लेखाधिकारी, असेच आणखी अनेक पदांचा समावेश आहे.
Q. जिल्हा परिषद भरती परीक्षेसाठी किती वेळ दिला जाईल?
Ans. भरती परीक्षेसाठी 2 तास (120 मिनिटे) वेळ दिला देण्यात येईल.
Q. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हापरिषद आहेत?
Ans. महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषद आहेत.
Q. जिल्हा परिषद भरती किती पदांसाठी घेतली जात आहे?
Ans. जिल्हा परिषद भरती 18,000 पेक्षा अधिक पदांसाठी घेतली जात आहे.
Q. जिल्हा परिषद भरती परीक्षेसाठी वयाची अट किती असेल?
Ans. साधारण 18 ते 43 वर्ष वय असू शकते, तरी पदानुसार वयाची अट असेल .
Q. जिल्हा परिषद काय आहे?
Ans. जिल्हा परिषद जिल्हा पातळीवरील स्थानिक सरकारी संस्था आहे.
Q. जिल्हा परिषद आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते ?
Ans. ” ZP ” या संक्षिप्त नावाने देखील ओळखले जाते.
Q. केंद्र व महाराष्ट्र शासनाची कोणती कामे जिल्हा परिषद करत असते?
Ans. विविध योजना व सेवा यांची माहिती साधारण ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम जिल्हा परिषद करते.
Q. जिल्हा परिषद भरती परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातील?
Ans. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
Q. जिल्हा परिषद भरती परीक्षा अभ्यासक्रम किती विषयांचा असेल?
Ans. जिल्हा परिषद भरती परीक्षेचा 5 विषयांचा अभ्यासक्रम असेल.