Van Rakshak Bharti Syllabus Marathi Forest Gurad Van Vibhag Bharti Exam Syllabus & Books – वनरक्षक भरती सरळ सेवा प्रक्रिये मार्फत होत असते. त्यामुळे वनरक्षक पदासाठी लागणारा शैक्षणिक पात्रता आणि अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप याबद्दलची माहिती या लेखात घेणार आहोत.
वनरक्षक भरती परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता (Education)
वनरक्षक भरतीसाठी अर्ज करणारे विद्यार्थी हे 12 वी पास असावेत, व गणित, विज्ञान किंवा भूगोल या विषयांपैकी कोणत्याही एका विषयात 12वी पास प्रमाणपत्र असावे. अनुसूचित जमाती मधील अर्ज करणारे विद्यार्थ्यांकडे कमीत कमी 10 वी पास प्रमाणपत्र असावे. व माजी सैनिक असलेले अर्जदार यांच्याकडे देखील 10वी पास झाल्याचे प्रमाणपत्र असल्यास अर्ज करण्यासाठी पात्र राहतील. वन कर्मचारी व वन खबरे हे नक्षली हल्ल्यात गंभीर जखमी किंवा शहीद झाले. असल्यास त्यांची मुले अर्ज करण्यास पात्र असतील पण यांच्याकडे 10वी पास असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे राहील.
वनरक्षक भरती परीक्षेसाठी वयाची अट (Age Limit)
साधारण प्रवर्गासाठी 18 ते 25 वर्ष आणि मागास प्रवर्ग साठी 18 ते 32 वर्ष ही वयाची अट वनरक्षक भरतीसाठी आहे
वनरक्षक परीक्षेसाठी पुस्तके (Van Rakshak Van Vibhag Bharti TCS & IBPS Books)
वनरक्षक भरती परिपूर्ण मार्गदर्शक | Buy |
वन रक्षक भरती 2023 संभाव्य सराव प्रश्न संच | Buy |
महाराष्ट्र वन विभाग भरती प्रश्न संच | Buy |
संपूर्ण वनरक्षक के सागर | Buy |
न रक्षक भरती A to Z प्रश्नपत्रिका संच | Buy |
TCS पॅटर्न नुसार वनरक्षक प्लॅनर | Buy |
वनपाल व वनरक्षक भरती परीक्षा | Buy |
वनरक्षक परीक्षेसाठी अभ्यासक्रम (Van Rakshak Bharti Exam TCS & IBPS Pattern Syllabus)
वनरक्षक भरती साठी लेखी परीक्षा साठी 4 विषयांचा अभ्यास केला जातो. मराठी, इंग्रजी, अंकगणित व बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या विषयांचा अभ्यास केला जातो.
या चार विषयांचा अभ्यास कसा व कोणत्या मुद्द्यांवर केला जातो याची माहिती सविस्तरपणे.
1) मराठी (Marathi)
काळ व काळाचे प्रकार,
नाम, सर्वनाम, विशेषण,
वाक्यरचना, प्रयोग,
समास, समानार्थी शब्द,
विरुद्धार्थी शब्द ,शब्द संग्रह,
वचन, संधी
म्हणी व वाक्यप्रचार वाक्यात उपयोग,
पुस्तके व लेखक यांची नावे, अलंकार
मराठी विषयाला एकूण 30 गुण असतात.
2) इंग्रजी (English)
Vocabulary, clauses,
fill in the blanks,
grammar, sentence structure,
spelling, one word substitution,
improvement, passage,
verbal comprehension passage,
spot the error, pronoun, antonyms,
synonyms, homonyms, part of speech,
verb, adverb, adjective,
detecting mis spelt word,
Idioms and phrases.
इंग्रजी या विषयाला 30 गुण असतात
3) अंकगणित व बुद्धिमत्ता (Arithmatic & Intelligence)
अंकगणित
बेरीज, वजाबाकी,
गुणाकार, भागाकार,
वर्ग व वर्गमूळ,
घन व घनमूळ,
लसावी , मसावी,
काम काळ वेग,
नफा तोटा, सरळव्याज,
चक्रवाढ व्याज,
चलन, मापनाची परिमाणे, सरासरी
बुद्धिमत्ता
अक्षर मालिका, वेगळा शब्द ओळखा,
वेगळा अंक ओळखा, समसंबंध,
वेन आकृत्या ,नातेसंबंध,
वाक्यावरून निष्कर्ष,
दिशा कालमापन, दिनदर्शिका,
विसंगत घटक ओळखा,कमलिका,
अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयाला एकूण 30 गुण असतात
4) सामान्य ज्ञान (General Knowledge)
महाराष्ट्राचा इतिहास,
महाराष्ट्र व भारत भूगोल,
समाज सुधारक, सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र ,
रसायनशास्त्र, जीवशास्त्र,
चालू घडामोडी खेळ पारितोषिक,
महत्त्वाचे व्यक्ती, विशेष दिवस, व तंत्रज्ञान माहिती.
सामान्य ज्ञान या विषयाला एकूण 30 गुण असतात.
वनरक्षक भरती परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern)
1) वनरक्षक भरतीसाठी एकूण 200 गुणांची परीक्षा होत असते
2) यामध्ये 120 गुणांसाठी लेखी परीक्षा घेतली जाते.
3) 4 विषयांना प्रत्येकी विषयाला 15 प्रश्न 30 गुणांसाठी विचारले जातात.
4) म्हणजेच प्रत्येकी एक प्रश्नाला 2 गुण असतात.
5) म्हणजे एकूण 60 प्रश्नांना 120 गुण दिले जातात.
6) व बाकीचे 80 गुण हे शारीरिक व मैदानी चाचणीसाठी असतात.
7) म्हणून लेखी परीक्षा व मैदानी चाचणी मिळून एकूण 200 गुणांची वनरक्षक भरती परीक्षा असते.
वनरक्षक भरती कशी होईल (Van Rakshak Bharti Exam)
वनरक्षक भरती परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस लिमिटेड (आय ओ एन) टी सी एस तर्फे घेतली जाईल.
वनरक्षक भरती परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल.
वनरक्षक भरती परीक्षेत 0.50 गुणांची निगेटिव्ह मार्किंग केली जाईल.
वनरक्षक भरती परीक्षेसाठी 90 मिनिटे वेळ दिला जाईल.
वनरक्षक भरती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी एकूण गुणांपैकी 45 % गुण मिळवणे अनिवार्य राहील.
यापेक्षा कमी गुण मिळाल्यास या परीक्षेत नापास केली जाईल.
वनरक्षक भरती परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना 45% गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले असतील.
तेच विद्यार्थी शारीरिक व मैदानी चाचणीसाठी पात्र असतील.
FAQ: Van Rakshak Bharti Syllabus Marathi Forest Bharti Exam Syllabus & Books
1. महाराष्ट्रात एकूण किती वन विभाग आहेत?
उत्तर. सध्याच्या काळात महाराष्ट्रात एकूण 50 अभयारण्य आहेत.
2.वनरक्षक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असते?
उत्तर. 10वी व 12वी किंवा जास्तीत जास्त पदवी.
3.वनरक्षक भरती परीक्षा एकूण किती गुणांची असते?
उत्तर. वनरक्षक भरती लेखी परीक्षा व शारीरिक मैदानी चाचणी मिळून 200 गुणांची असते.
4.वनरक्षक भरती परीक्षेसाठी किती विषयांचा अभ्यास केला जातो?
उत्तर. एकूण चार(4) विषयांचा अभ्यास केला जातो.
5.वनरक्षक भरती परीक्षेसाठी वयाची अट किती आहे?
उत्तर. साधारण प्रवर्ग साठी 18ते 27 वय आणि मागास प्रवर्गासाठी 18 ते 32 वय .
6. वनअधिकारी चे काय काम असते?
उत्तर. जंगलांचे रक्षण आणि जंगलाची व्यवस्थापन व जंगल संबंधी महसूल आणि खर्चाची नियंत्रण आणि या सर्व कामांचा अहवाल हे कामे करत असतात.
7. वनरक्षक भरतीसाठी महिला व पुरुष उंची किती असावी?
उत्तर पुरुषांसाठी 163 सेंटीमीटर अनुसूचित जमाती 152.5 सेंटीमीटर तर महिलांसाठी 150 सेंटीमीटर अनुसूचित जमाती महिलांसाठी 145 सेंटीमीटर इतकी उंची आवश्यक आहे.